Take a fresh look at your lifestyle.

कंगाल तालिबान..! विदेशातील अब्जावधी रुपये हडपण्याचा ‘असा’ केलाय प्लान; पहा, अमेरिकेचे काय आहे धोरण

नवी दिल्ली : तालिबान्यांकडे सध्या पैशांचा प्रचंड दुष्काळ पडला आहे. जागतिक संस्थांनी विदेशातील संपत्ती गोठवल्याने तालिबानी चांगलेच बिथरले आहेत. काही केल्या हा पैसा त्यांना मिळत नसल्याने त्यांनी आता पश्चिमी देशांवर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. या देशांनी मात्र तालिबानकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे तालिबान्यांचा चांगलाच तिळपापड झाला आहे. अफगाणिस्तानमध्ये सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. त्यासाठीच हा पैसा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे तालिबानने म्हटले आहे.

Advertisement

जगातील बँकांमध्ये अफगाणिस्तानचे जे परकीय चलन आहे, त्यावरील निर्बंध मागे घेण्याची मागणी तालिबानने केली होती. कतर येथे अमेरिकी शिष्टमंडळाच्या बैठकी दरम्यानही तालिबानी प्रतिनिधींनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अफगाणिस्तानच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या मुद्द्यावर पश्चिमी देशांनी मौन बाळगले आहे, असा आरोप तालिबानने केला आहे.

Advertisement

विदेशात असणारा हा पैसा परत मिळवण्यासाठी तालिबान प्रयत्न करत आहे. तालिबानच्या प्रतिनिधीने युरोपीय संघ प्रतनिधी मंडळासह अन्य 15 युरोपीय देशांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. अफगाणिस्तानच्या विदेशातील संपत्तीवरील निर्बंध रद्द करण्याची मागणी करण्यात आली. हा पैसा अफगाणिस्तानला परत मिळणे हा येथील लोकांचा अधिकार आहे.

Advertisement

मात्र, आम्हास अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही. मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, हा कायमस्वरुपी उपाय नाही. मानवी आणि राजकीय मुद्द्यांमध्ये अंतर असते. त्यामुळे राजनितीनक मुद्दा असेल त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना आणू नये, असे तालिबानी प्रवक्त्याने सांगितले.

Advertisement

दरम्यान, तालिबानने विदेशातील हा पैसा हस्तगत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मिडीया रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार, पश्चिमी बँकांनी अफगाणिस्तानची तब्बल 9 ते 10 अब्ज डॉलर्स संपत्ती फ्रीज केली आहे. अफगाणिस्तानमध्ये भविष्यात सरकारचे आचरण कसे असेल याचा अभ्यास करुन या संपत्तीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे अमेरिकेने म्हटले आहे.

Advertisement

म्हणजेच, आधी तालिबान्यांना शहाणे व्हावे लागणार आहे, योग्य पद्धतीने कारभार करावा लागणार आहे, असे केले तरच विदेशात जमा असणारा हा पैसा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, तालिबानचा स्वभाव आणि त्यांची कार्यपद्धती पाहता असे होणे आजिबात शक्य नाही. त्यामुळे तालिबानसाठी हा पैसा मिळणे कठीण आहे.

Advertisement

तालिबानने पाकिस्तानला फटकारले…! ‘त्या’ मुद्द्यावर पुन्हा दिलाय ‘हा’ गंभीर इशारा; पहा, कशामुळे होतोय वाद

Advertisement

अर्र… तालिबान्यांनी घेतलाय तुघलकी निर्णय; एकाच झटक्यात जिंदगी होणार शून्य भोपळा..!

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply