Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. BCCI नेही घेतलीय फिरकी; ‘तो’ निर्णय घेत सर्वांचे अंदाज केले फेल; पहा, ‘टी 20’ साठी असा आहे भारतीय संघ

मुंबई : आगामी टी 20 विश्वचषक स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावेळी भारताचा संघ विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्यामुळे या गोष्टीचा विचार करुनच संघ निवड होणार असल्याचे सांगण्यात येत होते. यंदा आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी करणारा हार्दिक पांड्या यास संघात घेतले जाणार नाही, अशीही चर्चा होती. त्यामुळे भारताच्या संघात कोणते खेळाडू असतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यानंतर आज बीसीसीआयने टी 20 संघात बदल झाल्याचे जाहीर केले आहे.

Advertisement

या संघात बीसीसीआयने एक महत्वाचा बदल केला आहे. आतापर्यंत राखीव खेळाडूंमध्ये असणाऱ्या शार्दुल ठाकूरला मुख्य संघात घेण्यात आले आहे. पण, त्यासाठी हार्दिक पांड्या नाही तर दुसऱ्याच अन्य खेळाडूला संधी दिलेली नाही. विशेष म्हणजे, यावेळी हार्दिक पांड्याला संघात प्रवेश मिळणार नाही असे सांगण्या येत होते. मात्र, बीसीसीआयने वेगळाच निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Advertisement

बीसीसीआयने बुधवारी या निर्णयाची माहिती दिली. शार्दुल ठाकूरचा मुख्य संघात समावेश केला आहे. तर त्याच्यासाठी अक्षर पटेल यास राखीव खेळाडूंमध्ये ठेवले गेले आहे. यावेळी अक्षर पटेलने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. हार्दिक पांड्याच्या तुलनेत त्याची कामगिरी चांगली राहिली आहे.

Advertisement

मात्र, असे असतानाही बीसीसीआयने टी 20 स्पर्धेसाठी संघ निवड करताना हार्दिक पांड्याला प्राधान्य दिले आहे. अक्षर पटेल हा भारतीय संघाच्या 15 सदस्यीय टीममध्ये होता. आता मात्र तो राखीव खेळाडू म्हणून संघासोबत असणार आहे. संघाच्या निवड समितीने संघ व्यवस्थापना बरोबर चर्चा करुन हा निर्णय घेतला आहे.

Advertisement

टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, दीपक चहर, आर. अश्विन, शार्दुल ठाकूर, वरुण चक्रवर्थी, जसप्रित बुमराह, भुवनेश्वर कुमार यांची निवड करण्यात आली आहे.

Advertisement

अरे आहात ना तय्यार..! टी 20 वर्ल्डकपचे आले की वेळापत्रक; पहा कुठे होणार ही स्पर्धा..!

Advertisement

टी-20 वर्ल्ड कपमध्ये संघांवर होणार बक्षिसांचा वर्षाव, पाहा कोणाला किती बक्षिस मिळणार…?

Advertisement
Advertisement

Leave a Reply