Take a fresh look at your lifestyle.

Waav.. आणि महाराष्ट्र काँग्रेसने फडणवीसांना मारलाय ‘तो’ भन्नाट टोला..!

पुणे : ‘मला एकही दिवस जाणवलं नाही की मी मुख्यमंत्री नाही म्हणून. मला असं वाटतं मी आजही मुख्यमंत्री आहे’, असे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यामुळे ‘मी पुन्हा येईन’ या लोकप्रिय घोषणेनंतर फडणवीस पुन्हा एकदा मिमर्सच्या केंद्रस्थानी आलेले आहेत.

Advertisement

हाच धागा पकडून महाराष्ट्र कॉंग्रेस पक्षाने फडणवीस यांना राजकीयदृष्ट्या लक्ष्य केले आहे. कॉंग्रेसने ट्विटरवर म्हटले आहे की, डॉक्टर म्हणतात, “हा त्रास तुम्हाला केव्हा पासून होत आहे?” त्यावर पेशंट उत्तर देताना बोलतात, “जेव्हा पासुन महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं, तेव्हा पासून!!” अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे भाजपचे समर्थक भडकले आहेत.

Advertisement

यावर निलेश गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, लाचार भामटे सत्तेत असुनसुद्धा तुम्हाला कोणी कवडीचीही किमंत देत नाही. आणि तुमचे कोणीच अयकत नाही. जसे मदाच्या बाटलीवर बसुन एखादी मासी तो काचच चाटत असती. त्या प्रकारे महाराष्ट्र काँग्रेसची अवस्था झाली आहे. तर, शुभम देव लिहितात की, जनतेची फसवणूक करून सत्तेत आलेलं दळभद्री सरकार आहे तुमचं, त्यामुळे फडणवीस साहेब पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान होतील यात काही तिळमात्र शंका नाही.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply