Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. पाकिस्तानमध्ये आता ‘त्या’चाही दुष्काळ; ‘त्या’ यादीत आल्याने कर्ज मिळणेही होणार कठीण

नवी दिल्ली : पाकिस्तान सारखा देश सध्या फक्त कर्ज मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण, या देशाची सध्याची परिस्थिती पाहता त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. पाकिस्तानवर अब्जावधींचे कर्ज आहे. त्यामुळे आधीच्या कर्जाचे हप्ते देण्यासाठी पुन्हा नवे कर्ज घ्यावे लागत आहे. आता तर पाकिस्तानवर आणखी वाईट दिवस येण्याची शक्यता आहे. जागतिक वित्तीय संस्था आणि अन्य देशांकडून कर्ज मिळणे अवघड होणार आहे. पाकिस्तान आता जगातील 10 मोठ्या कर्जदार देशांच्या यादीत सहभागी झाला आहे. इतकेच नाही तर ऋण सेवा निलंबनाच्या श्रेणीत आला आहे. त्यामुळे आता येथून पुढे या देशाला जगातून कर्ज मिळणे कठीण होणार आहे.

Advertisement

जागतिक बँकेच्या जागतिक कर्ज सांख्यिकी अहवालाचा हवाला देत न्यूज इंटरनॅशनलने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे, की कर्ज निलंबनाच्या श्रेणीत आलेल्या दहा कर्जदार देशांचे 2020 या वर्षात एकूण कर्ज 509 अब्ज डॉलर्स इतके होते. 2019 च्या तुलनेत हे कर्ज 12 टक्क्यांनी जास्त आहे. जगातील दहा मोठ्या कर्जदार देशांच्या यादीत अंगोला, बांग्लादेश, इथिओपिया, घाना, केनिया, मंगोलिया, नायजेरिया, पाकिस्तान, उज्बेकिस्तान आणि जांबिया या देशांचा समावेश आहे.

Advertisement

या देशांनी अन्य देश आणि जागतिक वित्तीय संस्थांकडून अब्जावधी डॉलर्सचे कर्ज घेतले आहे. कधी काळी पाकिस्तानची अर्थव्यवस्था दक्षिण कोरिया या देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही मजबूत होती. असे येथील मंत्री सांगतात. पण, आज मात्र पाकिस्तान जगात कर्जबाजारी देश म्हणून ओळखला जात आहे.

Advertisement

पाकिस्तानमध्ये सध्या खाद्यपदार्थांचे भाव प्रचंड वाढले आहेत. इंधनाच्या किंमतीही सातत्याने वाढत चालल्या आहेत. या देशात भ्रष्टाचार फोफावला आहे. या महत्वाच्या कारणांमुळे अर्थव्यवस्था पार कोलमडली आहे. त्यामुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी पाकिस्तान सरकारला कठोर निर्णय घेण्याव्यतिरिक्त पर्याय नाही. मात्र, सरकार असे काही करेल याची शक्यता नाही. कारण, सध्याच्या सरकारमधीलच अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. त्यामुळे या सरकारकडून देशाचा विकास होण्याची काहीच शक्यता नाही, असे येथील नागरिकच सांगत आहेत.

Advertisement

अर्र.. पाकिस्तानी अर्थमंत्र्यांचे भन्नाट उत्तर; ‘त्या’ युद्धांमुळे पाकिस्तानचे अब्जावधींचे नुकसान, पहा, कुणाला दिलाय दोष..?

Advertisement

अर्र.. चीन-पाकिस्तान ‘तेथून’ पळाले..! ‘त्यांना’ घाबरुन घेतला ‘हा’ धक्कादायक निर्णय; चीनला बसणार अब्जावधींचा फटका

Advertisement
Advertisement

Leave a Reply