Take a fresh look at your lifestyle.

आयपीएल फायनलचा दुसरा संघ कोणता..? आज होणार फैसला; दिल्ली-कोलकाता आमनेसामने

दुबई : आयपीएलच्या शेवटच्या टप्प्यातील सामने सध्या सुरू आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या बंगलोरच्या संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. मुंबईलाही प्ले ऑफमध्ये एन्ट्री मिळवता आली नाही. पहिल्या सत्रात खराब कामगिरी करणाऱ्या केकेआरने दुसऱ्या सत्रात जबरदस्त कामगिरी केली. त्यामुळे संघाने प्ले ऑफमध्ये धडक मारली. या टप्प्यातील पहिल्या सामन्यात मजबूत बंगलोरचा पराभव केला. आता या संघासमोर आज दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान असणार आहे. या सामन्यात जो विजयी होईल तो संघ थेट आयपीएल फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. याआधी चेन्नईने फायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे.

Advertisement

ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्ली संघाने यंदा कामगिरीत सातत्य राखत साखळी सामन्यात आघाडीचा क्रमांक पटकावला. मात्र, क्वालिफायर-1 सामन्यात चेन्नईने दिल्लीला अंतिम फेरीत पोहोचण्यापासून रोखले. अर्थात, अंतिम फेरीसाठी दिल्लीला आणखी एक संधी मिळणार आहे. त्यासाठी त्यांना इऑन कोलकाता संघाचा पराभव करावा लागणार आहे. कोलकाता संघाने एलिमिनेटर सामन्यात बंगलोर संघावर मात केली आहे. या विजयामुळे कोलकाताचा आत्मविश्वास वाढला आहे.

Advertisement

दिल्लीचा संघ 2019 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता. मागील आयपीएलमध्ये दिल्लीला उप विजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता दिल्ली संघ विजेतेपदासाठी दावेदार आहे. कारण, यावेळी संघाची कामगिरीही तशीच राहिली आहे. युएईमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या टप्प्यात दिल्लीने पाच सामने जिंकले असून, केवळ एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. विशेष म्हणजे, हा एकमेव पराभव कोलकात्याविरुद्ध आहे. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी दिल्ली संघ आज जोरदार प्रयत्न करील.

Advertisement

कोलकाता संघही यंदा जबरदस्त कामगिरी करत आहे. गोलंदाजी आणि फलंदाजीतही सातत्य राखले आहे. त्यामुळे अनेक संघांचा पराभव केला आहे. मागील सामन्यात मजबूत असणाऱ्या बंगलोरचाही पराभव केला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजयी होऊन कोण फायनलमध्ये एन्ट्री घेणार, याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

Advertisement

`ही` सहा कारणे की ज्यामुळे माहीचा चेन्नई सुपर किंग्स पोहोचला आयपीएल 2021 च्या अंतिम फेरीत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply