Take a fresh look at your lifestyle.

विसराळूपणा वाढतोय का… ? मग, ‘या’ सोप्या उपायांनी स्मरणशक्ती करा नियंत्रित; पहा, काय म्हटलेय तज्ज्ञांनी

अहमदनगर : आजच्या धावपळीच्या जमान्यात अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. आहाराकडे दुर्लक्ष होत आहे. फास्टफूड, जंकफुडचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सकस आहार मिळत नाही त्याचा दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. समरणशक्तीवरही परिणाम होत असून समरणशक्ती कमी होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. बऱ्याचदा तर अगदी लहान गोष्टी सुद्धा आपल्या लक्षात राहत नाही. कितीही आठवण्याचा प्रयत्न केला तरी काही केल्या आठवण राहत नाही. जसे वय वाढत जाते तशी ही समस्या जास्त वाढत जाते. असे असले तरी या समस्येवर नियंत्रण मिळवणे सुद्धा आपणास शक्य आहे. किंवा काही सोपे उपाय वापरून आपण आपली समरणशक्ती नियंत्रित ठेऊ शकतो.

Advertisement

ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांच्या नवीन संशोधनात म्हटले आहे की, जर तुम्ही दररोज 6 कपपेक्षा जास्त कॉफी प्यायली तर त्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. परिणामी, अशा लोकांमध्ये स्मृती कमी होण्याचा धोका (स्मृतिभ्रंश) 58 टक्क्यांपर्यंत आहे.

Advertisement

आपणास समरणशक्ती मजबूत करायची असेल तर दररोज सफरचंद खाल्ल्यास फायदा होईल. संशोधनानुसार स्मृती नष्ट होण्यापासून रोखणारे असे दोन महत्त्वाचे घटक सफरचंदामध्ये आढळले आहेत. या घटकांमुळे ‘अल्झायमर’ आणि ‘स्मृतिभ्रंश’ यांसारख्या आजारांचा धोका कमी होतो. हा दावा जर्मनीतील ‘जर्मन सेंटर फॉर न्यूरोडोजेनेरेटिव्ह डिसीज’ च्या शास्त्रज्ञांनी केला आहे.

Advertisement

वयाबरोबर कमी होत जाणाऱ्या स्मरणशक्तीवर नियंत्रण ठेवायचे असेल तर दुपारी 5 मिनिटांचा वेळ निश्चितच घ्या. चिनी शास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनात हा दावा केला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, झोपेची पद्धत वयानुसार बदलत असते, परंतु दुपारी घेतलेला काही वेळ सर्वांसाठी सामान्य असतो. हे मनासाठी फायदेशीर आहे.

Advertisement

अमेरिकेत केलेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की 50 वर्षांच्या वयात 6 तास किंवा त्यापेक्षा कमी झोपेमुळे स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो. जनरल नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, ज्या लोकांना पुरेशी झोप येत नाही त्यांना स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका जास्त असतो. या काही सोप्या मार्गांनी आपण आपली कमी होणारी स्मरणशक्ती नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो.

Advertisement

जास्त टीव्ही पाहताय का तुम्ही? मग वाचा त्याचे नेमके कसे आणि किती आहेत दुष्परिणाम

Advertisement

अर्र.. हे काय होऊन बसले आता..? करोनासह ‘हाही’ झटका मानवजातीला बसलाय की

Advertisement
Advertisement

Leave a Reply