Take a fresh look at your lifestyle.

हवालदिल बळीराजाला ठाकरे सरकारचा मदतीचा हात, पुरग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर, पाहा किती रुपयांची मदत केलीय..?

मुंबई : राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अपरिमित हानी झाली. काही ठिकाणी पुराच्या पाण्यात पिकांसह सारी शेती-मातीही वाहून गेली. काळ्या आईची झालेली अवस्था पाहून शेतकऱ्यांनी अक्षरक्ष: हंबरडा फोडला. कधीही भरुन येईल, असे बळीराजाचे नुकसान झाले. मात्र, अशा वेळी माय बाप सरकारने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत होती.

Advertisement

अखेर ठाकरे सरकार राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, अतिवृष्टी-पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने सुमारे 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली.

Advertisement

राज्यात जून ते ऑक्टोबर 2021 पर्यंत अतिवृष्टी, तसेच पुरामुळे 55 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’च्या निकषांची वाट न पाहता, 10 हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषित केले.

Advertisement

कोणाली किती मदत मिळणार..?

Advertisement
  • जिरायतीसाठी 10 हजार रुपये प्रति हेक्टर
  • बागायतीसाठी 15 हजार रुपये प्रति हेक्टर
  • बहुवार्षिक पिकांसाठी 25 हजार रुपये प्रति हेक्टर
    (ही मदत 2 हेक्टर मर्यादेत देण्यात येईल)

बळीराज्याच्या खात्यात दिवाळीपर्यंत ही मदत पोहोचवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. केंद्राकडून ३८ हजार कोटी रुपयांचे येणे आहे. महाराष्ट्रातील पूर, अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान पाहण्यासाठी अजून केंद्राचे पथक आलेले नाही. आम्ही दोन-तीनदा मोदी सरकारला त्यासाठी विनंती केली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

Advertisement

या आपत्तीत १० हजार कोटी रुपये मदत देण्याचे निश्चित केले आहे. त्यात रस्त्यांची दुरुस्ती, शेतजमिनीची दुरुस्ती व इतर नुकसान भरपाईचा समावेश आहे. दिवाळीपर्यंत ही मदत दिली जाईल.  पैशाची ओढाताण आहे, पण शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, हा आमचा शब्द असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

Advertisement

जिरायत, बागायत जमिनीसाठी प्रति हेक्टरी ६८०० रुपयांची केंद्राची मदत अपुरी आहे. त्यामुळे आम्ही ती प्रति हेक्टरी १० हजारांची मदत (दोन हेक्टरच्या मर्यादेत) देणार आहोत. फळपिकांसाठी १८००० रुपये प्रति हेक्टर ऐवजी २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

त्या संकटावर मात करण्यासाठी मोदी सरकारचा प्लान तयार; पहा, कोणता महत्वाचा निर्णय घेतला
विसराळूपणा वाढतोय का मग, या सोप्या उपायांनी स्मरणशक्ती करा नियंत्रित; पहा, काय म्हटलेय तज्ज्ञांनी

Advertisement
Advertisement

Leave a Reply