Take a fresh look at your lifestyle.

भाजपमधील प्रवेशाबाबत हर्षवर्धन पाटील यांचे धक्कादायक विधान, विरोधकांना मिळालेय आयतेच कोलित..

मुंबई : केंद्रातील भाजप सरकारकडून राजकारणासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत असल्याची तक्रार विरोधकांकडून केली जाते, तर दुसरीकडे भाजपने मात्र सातत्याने हा आरोप फेटाळला आहे.

Advertisement

केंद्रीय तपास यंत्रणांच्या रडारवर विधानसभा निवडणुकीच्या आधीपासून शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते आहेत. निवडणुकीआधीच शरद पवार यांनाही ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर आतापर्यंत अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, अनिल परब अशा अनेक नेत्यांमागे चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. या त्रासामुळेच काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचेही बोलले जाते.

Advertisement

विरोधकांच्या आरोपांना वरिष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या एका विधानामुळे पुष्टी मिळाली आहे. कधी काळी काँग्रेसचे प्रमुख नेते असलेले हर्षवर्धन पाटील विधानसभा निवडणुकीआधीच भाजपमध्ये गेले होते. त्यानंतर आता त्यांचे एक विधान चर्चेत आलंय नि त्यामुळे विरोधकांच्या हातात आयतंच कोलीत मिळाल्याचं सांगितलं जातंय.

Advertisement

एका खासगी कार्यक्रमाला भाजपा नेते म्हणूनच हर्षवर्धन पाटील यांनी नुकतीच हजेरी लावली. या वेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर भाजपाचे अनेक नेते आणि पदाधिकारी देखील उपस्थित होते. राजकीय नेत्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याच्या मुद्द्यावर हर्षवर्धन पाटील यांनी मिश्किल टोला लगावला. मात्र, त्यांच्या एका विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळीच चर्चा सुरू झालीय.

Advertisement

भाजपमध्ये आल्याने शांत झोप लागते..
भाजपमध्ये आल्यानंतर काय बदल घडला, याविषयी बोलताना पाटील म्हणाले, की “इथे आमदार साहेब मला म्हणाले, मी आहे तिथे सुखी आहे, तम्ही दिल्या घरी सुखी राहा… मला विचारणा झाली, की तुम्ही भाजपामध्ये का गेलात? त्यावर मी त्यांना म्हटलं, ते तुमच्या नेत्यालाच विचारा. पण, मी सांगतो, इथे मस्त निवांत आहे. भाजपमध्ये आल्यामुळे शांत झोप लागते. चौकशी नाही, काही नाही. मस्त वाटतंय..”

Advertisement

संजय राऊत यांचा टोला..
हर्षवर्धन पाटील यांच्या या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, की “हर्षवर्धन पाटील कधी काळी काँग्रेसचे नेते होते. ते म्हणाले, की भाजपामध्ये गेलं की शांत झोप लागते. चौकशीचा ससेमिरा मागे लागत नाही. या त्यांच्या एका वाक्यात सगळं सामावलेलं आहे..”

Advertisement
Advertisement

Leave a Reply