Take a fresh look at your lifestyle.

अमेरिका, रशिया, चीनलाही बसणार जोरदार झटका; पहा, ‘तिथे’ भारत ठरणार नंबर वन

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटाचा मोठा फटका सहन केल्यानंतर आता देश या संकटातून बऱ्यापैकी सावरला आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाला तसा देशात आर्थिक घडामोडींनी वेग घेतला आहे. आर्थिक विकासाचा वेग दिवसेंदिवस सुधारत चालला आहे. देशाच्या या कामगिरीचा सकारात्मक परिणाम होत आहे. सन 2022 हे वर्ष भारतासाठी सकारात्मक ठरणार आहे, असा अंदाज जागतिक वित्तीय संस्थांनी व्यक्त केला आहे. अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर भारत जगातील अनेक विकसित देशांनाही मागे टाकण्याची शक्यता आहे.

Advertisement

कोरोना काळात देशाच्या जीडीपीत मोठी घट झाली होती. आता मात्र तशी परिस्थिती नाही. त्यामुळे भारताचा विकास दर 2022 मध्ये अमेरिका, चीन, जपान, रशिया या देशांपेक्षाही जास्त असेल, असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केला आहे. संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार, सन 2021 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 9.5 टक्के आणि 2022 मध्ये 8.5 टक्क्यांनी वाढणे अपेक्षित आहे. 2022 मध्ये भारताचा विकास दर हा चीनच्या 5.6 टक्के, अमेरिका 5.2 टक्के, जपान 3.2 टक्के आणि रशियाच्या 2.9 टक्क्यांपेक्षाही जास्त राहणार आहे.

Advertisement

कोरोना काळात देशाच्या अर्थव्यवस्थेस जबरदस्त फटका बसला होता. लाखो लोकांचे रोजगार गेले. उद्योग बंद पडले. गरीबी वाढली. नागरिकांचे उत्पन्नही कमी झाले. अशा अनेक संकटांचा सामना करावा लागला. त्यानंतर कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर मात्र परिस्थिती वेगाने बदलत आहे. अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. रोजगारांचे प्रमाणही वाढत चालले आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाने पुन्हा वेग घेतला आहे. यावेळी तर जगातील अनेक मोठ्या देशांना मागे टाकण्याची तयारी केल्याचे दिसत आहे.

Advertisement

अमेरिकेचा विकास या वर्षात सहा टक्के तर पुढील वर्षात 5.2 टक्के वाढण्याचा अंदाज आहे. चीनचा विकास दर 2021 मध्ये आठ टक्के तर 2022 मध्ये 5.6 टक्के दराने वाढू शकतो

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply