Take a fresh look at your lifestyle.

सणासुदीच्या काळात खुशखबर..! केंद्र सरकारने घेतलाय लोकांच्या हिताचा निर्णय; घरखर्चाचे बजेट होईल सोपे

नवी दिल्ली : सातत्याने वाढत जाणारी महागाई आणि सणासुदीचा काळ लक्षात घेता अखेर केंद्र सरकारने लोकांच्या हिताचा निर्णय घेतला आहे. सरकारने पुन्हा एकदा खाद्यतेलांवरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून देशभरात या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे. पाम तेल, सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलावरील कृषी उपकरात मार्च 2022 पर्य़ंत कपात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे तेलाच्या किमती काही प्रमाणात कमी होतील, असा दावा सरकारने केला आहे.

Advertisement

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क बोर्डाने याबाबत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. हा निर्णय गुरुवारपासून अंमलात येणार आहे. या निर्णयामुळे तेलावरील कर कमी होणार आहेत. कच्च्या पामतेलावर आता 7.5 टक्के कृषी उपकर आकारला जाणार आहे. सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलासाठी आता 5 टक्के कर आकारणी होणार आहे. या आधी हा कर जास्त होता. सूर्यफूल, सोयाबीन, पामोलिन आणि पाम तेलावरील सीमा शुल्क 32.5 टक्क्यांवरुन 17.5 टक्के करण्यात आले आहे.

Advertisement

मागील महिन्यातही केंद्र सरकारने पाम तेल, सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेलावरील सीमा शुल्क कमी केले होते. तसेच पाम तेलावरील आयात शुल्क 10 टक्क्यांवरुन 2.5 टक्के केले होते. सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क 7.5 टक्क्यांवरुन 2.5 टक्के केले होते. या कपातीमुळे तेलाचे दर काही प्रमाणात कमी झाले होते. मात्र,  या कपातीचा फारसा उपयोग झाला नाही.

Advertisement

त्यानंतर सरकारने आणखी काही निर्णय घेतले. सणासुदीच्या काळात तेलाची साठेबाजी होणार नाही, यासाठी कठोर निर्णय घेतले. तसेच आता पुन्हा तेलावरील कर कमी करत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. खाद्यतेलावरील कर कमी केल्यामुळे तेलाचे भाव कमी होतील असे अपेक्षित आहे.

Advertisement

तरीही खाद्यतेलांचे भाव वाढलेच; सणासुदीच्या काळात नागरिकांना झटका; सरकारी निर्णयही ठरले अपयशी

Advertisement

.. ‘त्या’ मुळे देशात खाद्यतेलांच्या किंमती होतील कमी; पहा, तज्ज्ञांनी काय सांगितली कारणे

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply