Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे, आजपासून ‘इतके’ दिवस बँका राहणार बंद, पहा, काय आहे बँकांचे वेळापत्रक

नवी दिल्ली : पुढील काही दिवसात बँकेच्या कामकाजाचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. ऑक्टोबर महिन्यात बँकांना बऱ्याच सुट्ट्या आहेत. आता आजपासून पुढील आठ दिवस देशातील बँका बंद राहणार आहेत. सर्वच राज्यात एकाच वेळी बँकांना सुट्टी नाही. म्हणजे, एखाद्या राज्यातील बँका बंद असल्या तरी दुसऱ्या राज्यात बँका सुरू असतील. रिजर्व बँकेने ऑक्टोबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामुळे पुढील आठ दिवसात तुमचे बँकेत काही काम असेल तर आधी बँक सुरू आहे का याची माहिती घेणे आवश्यक राहणार आहे.

Advertisement

आज आगरतळा, भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता, पाटणा आणि रांची येथे बँका बंद आहेत. 14 ऑक्टोबर रोजी आगरतळा, बंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, कोची, कोलकाता, लखनौ, पटना, रांची, शिलाँग, श्रीनगर, तिरुअनंतपुरम येथे बँका बंद राहतील. 15 ऑक्टोबरला दसरा आहे. या दिवशी इंफाळ आणि सिमला वगळता दसरा सणानिमित्त देशात सर्वत्र बँका बंद राहतील. 16 ऑक्टोबरला फक्त शनिवारी गंगटोकमध्ये बँका बंद राहतील. 17 ऑक्टोबर हा रविवार आहे, या दिवशी देशात सर्वत्र बँकेला सुट्टी असते. 18 ऑक्टोबरला फक्त गुवाहाटीमध्ये बँका बंद राहतील.

Advertisement

19 ऑक्टोबर या दिवशी अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, कानपूर, कोची, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर, तिरुअनंतपुरम येथे बँकांना सुट्टी असेल. 20 ऑक्टोबर रोजी आगरतळा, बंगळुरू, चंदीगड, कोलकाता आणि शिमला बँका बंद राहतील. तसेच 22, 23, 24, 26 आणि 31 ऑक्टोबरलाही बँकांना सुट्टी आहे.

Advertisement

बाब्बो.. पुढच्या महिन्यात तब्बल 20 दिवस बँका राहणार बंद; पहा, कोणत्या राज्यात कधी राहणार बँका बंद

Advertisement
Advertisement

Leave a Reply