Take a fresh look at your lifestyle.

बापरे.. ‘त्या’ संकटाचा पडलाय ‘असा’ इफेक्ट..! माणसांचे आरोग्य आलेय धोक्यात; WHO ने केलाय ‘हा’ धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली : जगभरात वायू प्रदूषणाच्या समस्येने किती विक्राळ रुप धारण केले आहे, हे नव्याने सांगायला नको. मोठ्या शहरांमध्ये होणाऱ्या प्रदूषणामुळे सहज लक्षात येईल. आता तर हे प्रदूषण मानवी जीवनावरच जबरदस्त आघात करणारे ठरत आहे. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाच्या कार्य पद्धतीत हस्तक्षेप केल्याचे दुष्परिणाम आज अवघ्या मानव समाजाला भोगावे लागत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात वायू प्रदूषणाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे.

Advertisement

या अहवालानुसार, वायू प्रदूषणामुळे जगात प्रत्येक मिनिटाला 13 लोकांचा मृत्यू होत आहे. ग्लासगो येथे सुरू असलेल्या जलवायू परिवर्तन संमेलनात आरोग्य संघटनेने हा अहवाल जाहीर केला. तसेच या समस्येबाबत एक गंभीर इशाराही दिला आहे. त्यामुळे आता परिस्थिती आधिक खराब होणार नाही, आणि पर्यावरणाचे संतुलन राखले जाईल, यादृष्टीने काम करणे गरजेचे ठरणार आहे.

Advertisement

या संमेलनाआधी आयोजित बैठकीत संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस घेब्रेयेसस यांनी सांगितले, की ग्लोबल वॉर्मिंगला 1.5 डिग्री सेल्सिअसपर्यंत मर्यादीत ठेवण्यासाठी जगातील सर्व देशांनी कार्यवाही करावी. या दृष्टीने प्रयत्न करणे सर्वांच्याच हिताचे असल्याचे त्यांनी सांगितले. जीवाश्म इंधनाच्या ज्वलनामुळे लोकांचा मृत्यू होत आहे. जलवायू परिवर्तन आजमितीस आरोग्यापुढील सर्वात मोठे संकट ठरले आहे.

Advertisement

या संकटामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांपासून आज कोणीही सुरक्षित नाही. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी आता निर्णायक कार्यवाही करणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा पुढील पिढ्यांसाठी हे संकट आधिक धोकादायक ठरेल, असा इशारा या अहवालाद्वारे देण्यात आला आहे.

Advertisement

मानवी आरोग्याचे रक्षण करण्यासाठी ऊर्जा, परिवहन, प्रकृती, खाद्य प्रणाली, वित्तसहीत अन्य संबंधित क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची गरज आहे. असे केले गेले तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसतील, असे सांगण्यात आले. वायू प्रदूषणाची समस्या कमी करणे गरजेचेच आहे. त्याकडे आता दुर्लक्ष करता येणार नाही. कारण, लहान आणि मोठ्या शहरात आज प्रदूषण प्रचंड वाढले आहे. त्याचा परिणाम थेट मानवी आरोग्यावर होत आहे.

Advertisement

प्रदूषण कमी करण्यासाठी केजरीवाल सरकार करणार ‘असा’ प्लान; पहा, काय नियोजन आहे सरकारचे

Advertisement

भन्नाटच आहे की…! आता गुगल देणार ‘त्या’ महत्वाच्या प्रश्नांचे उत्तर; पहा, पर्यावरणाचा ‘कसा’ होणार फायदा..?

Advertisement

‘त्या’ संकटावर मात करण्यासाठी सरकारने केलाय ‘असा’ प्लान; पहा, लोकांचे आरोग्य ‘कसे’ सुधारणार ?

Advertisement
Advertisement

Leave a Reply