Take a fresh look at your lifestyle.

आश्चर्यच आहे की… इंधनाचे दर वाढले पण, महागाई मात्र कमी; पहा, नेमके काय म्हटलेय ‘त्या’ अहवालात

नवी दिल्ली : देशातील महागाई वाढण्यामागे इंधन दरवाढ हे एक मोठे कारण आहे. इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे देशांतर्गत महागाईत वाढ झाली आहे. मागील काही महिन्यात किरकोळ महागाईचा दर प्रचंड वाढला आहे. सप्टेंबर महिन्यात मात्र वेगळी परिस्थिती होती. या महिन्यात महागाई होती मात्र, अन्य महिन्यांच्या तुलनेत कमी होती, राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
देशात खाद्य पदार्थांच्या किंमती कमी झाल्याने सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दरात घट झाली आहे. या महिन्यात किरकोळ महागाई दर 4.35 टक्के इतका राहिला आहे. ऑगस्ट 2021 मध्ये मात्र महागाई दर 5.30 टक्के इतका होता. तर मागील सप्टेंबर 2020 मध्ये 7.27 टक्के इतका महागाई दर होता.

Advertisement

देशातील महागाईचा विचार केला तर सध्या खाद्य तेलांच्या किमती रेकॉर्ड ब्रेक वाढल्या आहेत. तेलांवरील आयात शुल्क कमी केल्यानंतर काही प्रमाणात तेलाचे दर कमी झाल्याचा दावा सरकारने केला आहे. या व्यतिरिक्त अन्य खाद्य पदार्थांच्या किंमतीही जास्त आहेत. मात्र, सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात महागाईचा दर कमी झाल्याचे दिसत आहे. म्हणजेच, खाद्य पदार्थांची महागाई काही प्रमाणात कमी झाल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

तसे पाहिले तर, देशात आजमितीस पेट्रोल आणि डिझेलचे दर कधी नव्हे इतके वाढले आहेत. ऑक्टोबर महिन्यात तर दरवाढ थांबण्याचे नाव घ्यायला तयार नाही. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम म्हणून इंधनाचे दर वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. या इंधना बरोबरच एलपीजी गॅसचे दर सुद्धा वाढले आहेत. इंधनाचे दर मात्र कमी होण्यास तयार नाहीत. अशा परिस्थितीत किरकोळ महागाई दर मात्र कमी झाल्याचा अहवाल राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने दिला आहे.

Advertisement

बाब्बो.. सरकारच्या ‘त्या’ निर्णयाने महागाई आऊट ऑफ कंट्रोल; ‘या’ देशात 2657 रुपयांत मिळतोय एलपीजी गॅस

Advertisement

किती ही महागाई..! पेट्रोल-डिझेलनंतर आता ‘या’ इंधनाचे दर वाढले; जाणून घ्या, काय आहे नेमके कारण

Advertisement
Advertisement

Leave a Reply