Take a fresh look at your lifestyle.

देशातील ‘त्या’ संकटास मोदी सरकार जबाबदार; राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेय जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : देशभरात कोळसा टंचाईने मोठा हाहाकार उडाला आहे. राज्यातही कोळसा टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. वीज निर्मिती प्रकल्पांना तत्काळ वीज पुरवठा केला नाही तर ऐन सणासुदीच्या काळात लोकांना भारनियमनाचा त्रास सहन करावा लागणार आहे. या मुद्द्यावर जोरदार राजकारण सुरू झाले आहे. राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकार आणि विरोधक पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. देशात आज कोळसा टंचाई निर्माण झाली आहे, त्यास मोदी सरकारचे धोरण जबाबदार आहे, असा आरोप राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

Advertisement

देशात कोळसा मिळत नाही. त्यामुळे देशातील व राज्यातील बरेच वीज निर्मिती संच बंद पडले आहेत. दुसऱ्या देशांकडून कोळसा आणावा लागत आहे, यामध्ये परकीय चलन मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. देशातील खाणीत कोळसा आहे पण खणीकरण होत नाही. त्यामुळे परदेशातून कोळसा आणावा लागत आहे, या परिस्थितीस मोदी सरकार जबाबदार आहे, असे मलिक यांनी सांगितले.

Advertisement

याआधी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. सरकार आणि वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये काहीच ताळमेळ नसल्याने आज राज्यात ही वेळ आली आहे. राज्य सरकारकडे कोळशाचे 2800 कोटी रुपये थकीत आहेत. ऊर्जा विभागाने कोळशाचे योग्य नियोजन केले नाही. कोळशाचा पुरेसा साठा केला नाही, त्यामुळे आज ही वेळ आली आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली होती. त्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी कोळसा टंचाईस केंद्र सरकारचे धोरण जबाबदार असल्याचे स्पष्ट करत प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

दरम्यान, देशभरातच कोळशाची टंचाई जाणवत आहे. अनेक वीज निर्मिती प्रकल्प बंद पडले आहेत. काही प्रकल्पात अत्यंत कमी कोळसा शिल्लक राहिला आहे. राज्यांनी केंद्र सरकारकडे तक्रारीही केल्या आहेत. मात्र, देशात कोळसा टंचाई नाही, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. वीज निर्मिती प्रकल्पांना पुरेसा कोळसा मिळेल आणि विजेची कमतरता जाणवणार नाही, असे सरकारने म्हटले आहे. या प्रकरणी केंद्र सरकार नियोजन करत आहे.

Advertisement

आता कोळशाचेही राजकारण..! राज्यांच्या तक्रारीनंतर मोदी सरकारने केला ‘हा’ दावा; पहा, नेमके काय म्हटलेय सरकारने

Advertisement

देशात कोळसा टंचाईने हाहाकार; ‘या’ राज्यात मात्र 9 दिवसांत हजारो टन कोळसा गेला वाया; पहा, आता काय होतील परिणाम..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply