Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून बंगलोरला बसला पराभवाचा झटका; पहा, विराटच्या ‘त्या’ निर्णयाने बिघडले गणित

दुबई : यंदाच्या आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतरही बंगलोर संघाचे खाते रिकामेच राहिले आहे. काल कोलकाता विरुद्ध झालेल्या सामन्यात बंगलोरला पराभव पत्करावा लागला. या सामन्यात कोलकाताने वर्चस्व राखले. या संघाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यामुळे त्यांना या सामन्यात विजय मिळवता आला.

Advertisement

केकेआर विरुद्धच्या या महत्वाच्या सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकली, आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण आतापर्यंतचा कोलकाताच्या संघाचा युएईमधला रेकॉर्ड पाहिला तर त्यांनी इथे एकही सामना धावांचा पाठलाग करताना गमावलेला नाही. त्याचबरोबर आरसीबीचा संघ हा आतापर्यंत धावांचा पाठलाग यशस्वीपणे करत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे हा अनुभव असतानाही कोहलीने हा निर्णय का घेतला, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Advertisement

सामन्यात पराभव झाल्यानंतर विराटने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, की ‘आतापर्यंत मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन वर्षांमध्ये संघाची चांगली बांधणी झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण आता यापुढे मी आरसीबीचा कर्णधार राहणार नाही. मी आता आरसीबीचा कर्णधार नसलो तरी संघाबरोबर एक खेळाडू म्हणून नक्कीच कायम असेन.’

Advertisement

2011 ते 2021 या काळात विराटने बंगलोर संघाचे नेतृत्व केले. या काळातील 140 सामन्यांपैकी 66 सामने जिंकले तर 70 सामन्यात पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे, या संघाने आतापर्यंत एकदाही आयपीएल विजेतेपद मिळवलेले नाही. यावेळी संधी होती. मात्र, महत्वाच्या सामन्यात संघाने निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे पुन्हा एकदा बंगलोर संघाचा भ्रमनिरास झाला आहे. आता बंगलोर संघाचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्स विरोधात होणार आहे.

Advertisement

विराट कोहलीने या प्रमुख कारणामुळे सोडले भारतीय टी-२० संघ आणि `आरसीबी`चे कर्णधारपद… काय असेल कारण?

Advertisement

‘त्या’ महत्वाच्या सामन्याआधीच बंगलोरला झटका; संघातील दोन खेळाडू आयपीएलबाहेर; पहा, काय आहे कारण

Advertisement
Advertisement

Leave a Reply