Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. सरकारच्या ‘त्या’ निर्णयाने महागाई आऊट ऑफ कंट्रोल; ‘या’ देशात 2657 रुपयांत मिळतोय एलपीजी गॅस

कोलंबो : कोरोनाच्या संकटाने सगळ्याच देशांना हैराण केले आहे. गरीब आणि विकसनशील देशांना या संकटाचा मोठा फटका बसला आहे. त्यात आता अनेक देशात महागाईने अगदीच विक्राळ रुप धारण केले आहे. भारतात तर महागाई रोज नवीन रेकॉर्ड करत आहे. अशीच परिस्थिती शेजारच्या देशांमध्येही आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी सरकारने योग्य निर्णय घेणे गरजेचे असते. मात्र, श्रीलंका सरकारने वाढती महागाई पाहता असा एक निर्णय घेतला, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

Advertisement

श्रीलंकेमध्ये अत्यावश्यक वस्तूंवरील दर नियंत्रण हटवण्यात आल्याची घोषणा सरकारने केल्यानंतर नागरिकांचे हाल होत आहेत. देशात महागाईचा भडका उडाला आहे. महागाई पण किती, घरगुती गॅसच्या किमती तब्बल 90 टक्क्यांनी वाढल्या आहेत. 1400 रुपयांचा गॅस सिलिंडर आता 2657 रुपयांना मिळत आहे. 250 रुपयांना मिळणारी दूध पावडर तब्बल 1195 रुपयांना विक्री होत आहे. या भाववाढीवर आता कोणाचेच नियंत्रण राहिलेले नाही.

Advertisement

पीठ, साखर या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. ग्राहक संरक्षण प्राधिकरण प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरवठा आधिक प्रभावीपणे व्हावा, यासाठी मंत्रिमंडळाने दूध पावडर, पीठ, साखर आणि घरगुती गॅस टाकीवरील दर नियंत्रण काढून टाकण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे किमती 37 टक्के वाढतील असा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र, भाववाढीवर कोणतेच नियंत्रण राहिलेले नाही. या निर्णयामुळे नफेखोरी वाढेल, याचा अंदाज सरकारला नव्हता. नफेखोरांनी या संधीचा फायदा घेत मनमानी पद्धतीने भाववाढ केली आहे. सरकारने आता तातडीने हस्तक्षेप करुन दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणी होत आहे.

Advertisement

देशात निर्माण झालेल्या या संकटावर मात करण्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण, देशात अशी परिस्थिती दीर्घकाळ राहणे योग्य नाही. त्यामुळे आता श्रीलंका सरकार काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

शेजारी खायला महाग..! पाकिस्तानात एक किलाे साखर 110 रुपये, महागाईने जनतेची होरपळ, पाहा कशामुळे आलीय ही वेळ..?

Advertisement

कोरोना महामारी अन् महागाईचा असाही इफेक्ट; खाद्यतेलांच्या बाबतीत पहिल्यांदाच ‘असे’ घडण्याची शक्यता

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply