Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकार जीएसटीबाबत ‘तो’ निर्णय घेण्याच्या विचारात; पहा, नागरिकांना ‘कसा’ बसणार फटका..?

नवी दिल्ली : महागाईने आधीच हैराण असलेल्या देशातील नागरिकांना मोदी सरकार आणखी एक झटका देण्याची तयारी करत आहे. केंद्र सरकार असा एक निर्णय घेण्याचा विचार करत आहे, ज्याचा त्रास शेवटी नागरिकांनाच सहन करावा लागणार आहे. वस्तू व सेवा करात (जीएसटी) सरकार लवकरच वाढ करण्याची शक्यता आहे. ब्लूमबर्गने दिलेल्या माहितीनुसार, सरकार लवकरच काही वस्तू आणि सेवांवरील करात वाढ करण्याच्या विचारात आहे. जीएसटी कर आकारणी आधिक सोपी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

जीएसटी परिषदेची आगामी बैठक डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यावेळी जीएसटीतील बदलांना मंजुरी मिळू शकते. मिळालेल्या माहितीनुसार, जीएसटीच्या चार टप्प्यांऐवजी तीनच ठप्पे ठेवले जातील. मात्र, काही वस्तू आणि सेवांवरील करात वाढ होऊ शकते.

Advertisement

सध्या वस्तू आणि सेवा कर कायद्यात 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के असे चार टप्पे आहेत. त्यानुसार जीवनावश्यक वस्तूंवर सर्वात कमी तर अन्य वस्तूंवर सर्वात जास्त कर आकारला जातो. मात्र, प्रस्तावित बदलांनुसार 5 आणि 12 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये एका टक्क्याची वाढ होऊ शकते. त्यामुळे या दोन्ही स्लॅबचा दर 6 टक्के आणि 13 टक्के इतका होईल. या व्यवस्थेची घडी नीट बसल्यानंतर जीएसटीचे चारऐवजी तीन टप्पे ठेवण्यात येतील. सर्व राज्यांच्या अर्थमंत्र्यांना याबाबत आपले प्रस्ताव सादर करण्यासाठी नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत मुदत देण्यात आल्याचे समजते.

Advertisement

अर्थ मंत्रालयाच्या प्रवक्त्याने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. जीएसटी दरात वाढ करण्याची ही योजना अशा वेळी केली जात आहे जेव्हा पुढील वर्षी देशाच्या मोठ्या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. या हालचालींवर देशात टीका होऊ शकते. कोरोना विषाणूच्या साथीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. त्यामुळे सरकार हा निर्णय कधी घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

केंद्र सरकारने जर असा निर्णय घेतला तर काही वस्तू आणि सेवांच्या करात वाढ होईल. कर वाढल्यामुळे कदाचित या वस्तूंच्या किमतीही वाढतील. मग, त्याचा त्रास नागरिकांनाच होणार आहे. आधीच वाढत्या महागाईने हैराण केले आहे. सणासुदीच्या दिवसात सुद्धा महागाई कमी झालेली नाही. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Advertisement

धन धना धन..! सरकारी तिजोरी मालामाल, ‘जीएसटी कलेक्शन’मधून किती कमाई झाली पहा..?

Advertisement

जीएसटीबाबत सुप्रीम कोर्टाने फटकारले; पहा नेमके कोणत्या मुद्द्यांवर सुनावले सरकारी यंत्रणेला

Advertisement
Advertisement

Leave a Reply