Take a fresh look at your lifestyle.

नोकरदारांसाठी आनंदाची बातमी..! ‘पीएफ’ व्याजाचे पैसे लवकरच जमा होण्याची शक्यता; पहा, काय आहे सरकारचे नियोजन

नवी दिल्ली : देशातील जवळपास सहा कोटी पीएफ खातेधारकांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. केंद्र सरकार लवकरच व्याजाची रक्कम पीएफ खातेधारकांच्या बँक खात्यात जमा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ईपीएफओ लवकरच सहा कोटींपेक्षा जास्त खातेधारकांच्या खात्यात सन 2020-21 या आर्थिक वर्षाचे व्याज हस्तांतरीत करण्याची घोषणा करू शकते, अशी माहिती मिळाली आहे. कामगार मंत्रालयाने या निर्णयास मंजुरी दिली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही होणार आहे. दिवाळीपूर्वी कधीही हे पैसे नोकरदारांच्या पीएफ खात्यात जमा होऊ शकतात, असा अंदाज आहे.

Advertisement

ईपीएफओने आर्थिक वर्ष 2020-21 साठी व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. गेल्या सात वर्षातील हा सर्वात कमी व्याजदर आहे. याआधी 2012-13 मध्ये सरकारने 8.5 टक्के दराने व्याज दिले होते. आर्थिक वर्ष 2019-20 वर्षात 8.50 टक्के दराने पीएफवर व्याज मिळाले होते. 2018-19 मध्ये हा दर 8.55 टक्के होता. तर 2017-18 या आर्थिक वर्षात हा दर 8.65 टक्के होता.

Advertisement

भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) दिवाळीपूर्वी नोकरदारांच्या खात्यात वाढीव व्याजदराचे पैसे जमा करेल, असा अंदाज आहे. या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी EPFO केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून परवानगी मिळण्याची वाट पाहत आहे. दिवाळीपूर्वी कधीही हे पैसे नोकरदारांच्या पीएफ खात्यात जमा होऊ शकतात.

Advertisement

दरम्यान,  देशभरात आता  कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. रोजगारांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पीएफ सभासदांची संख्या वाढत आहे. रोजगाराचे प्रमाण वाढल्यानंतर पीएफ खातेधारकांच्या संख्येतही वाढ होत आहे. सध्याची परिस्थिती पाहता आगामी काळात यामध्ये आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज आहे

Advertisement

 

Advertisement

दिवाळीआधी नोकरदारांना मिळणार गिफ्ट; पीएफबाबत केंद्र सरकार ‘हा’ निर्णय घेण्याची शक्यता

Advertisement

पीएफमधून अडव्हाॅन्स रक्कम काढणे कितपत योग्य, जाणकार काय म्हणतात, वाचा..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply