Take a fresh look at your lifestyle.

आज सोने-चांदीचा ट्रेंड बदलला; सोन्याचे दर वाढले, चांदीही चमकली; पहा, काय आहे आजचे भाव

मुंबई : जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम देशातील सोने मार्केटवर होत आहे. काल आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर कमी झाले होते. आज मात्र हा ट्रेंड बदलला आहे. आज सोन्याच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. मंगळवारी सकाळच्या सत्रात सोने 240 रुपये तर चांदीच्या दरात 300 रुपयांनी वाढ झाली. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव 47 हजार 227 रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे. यामध्ये 176 रुपये वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव 61 हजार 790 रुपये असा असून यामध्ये 46 रुपये वाढ झाली आहे. सकाळच्या सत्रातील हे भाव आहेत, त्यामुळे दिवसभरात यामध्ये बदल होण्याचीही शक्यता आहे.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते.

Advertisement

त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजरांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. परिस्थितीत बदल होत असल्याने सोने लवकरच 50 हजारांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

Goodreturns या वेबसाईटनुसार आज मंगळवारी मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 45 हजार 950 रुपये आहे. 24 कॅरेटचा भाव 46 हजार 950 रुपये आहे. आज दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 300 रुपये आहे. 24 कॅरेटसाठी सोन्याचा भाव 50 हजार 510 रुपये झाला आहे. चेन्नई शहरात 22 कॅरेटसाठी 44 हजार 300 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 48 हजार 320 रुपये आहे. कोलकाता मध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 46 हजार 350 रुपये असून 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार 050 रुपये आहे.

Advertisement

सोन्याच्या दरात आज कपात, चांदीची चमक मात्र वाढली; पहा, काय आहेत सोने मार्केटमधील अपडेट

Advertisement

घरात किती सोने ठेवता येते..? आयकर विभाग कधी कारवाई करु शकतो.. नियम काय सांगतो..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply