Take a fresh look at your lifestyle.

विराटनंतर ‘आरसीबी’च्या कॅप्टन पदासाठी हे नाव आले समोर, निवड निश्चित असल्याची चर्चा.

मुंबई : कर्णधार म्हणून विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी यंदाची इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2021)ही निराशजनक ठरली. कोलकाता नाइट रायडर्सनं (KKR) प्ले-ऑफ सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB)चे आव्हान संपुष्टात आणले. विराट कोहलीने कर्णधार म्हणून यंदाची आयपीएल त्याच्यासाठी अखेरची असल्याचे आधीच जाहीर केले होते. त्यामुळे कर्णधार म्हणून यंदाही त्याची आयपीएल जेतेपदाची पाटी कोरीच राहिली. आता यापुढे तो फक्त खेळाडू म्हणूनच आरसीबीसाठी खेळणार आहे.

Advertisement

दरम्यान, संघ पराभवाकडे वाटचाल करीत असताना, विराटच्या चेहऱ्यावरचे भाव बरेच काही सांगून जात होते. त्याला निराश झालेले पाहून, चाहत्यांनीही हळहळ व्यक्त केली. विराटनंतर आता या संघाची धुरा कोण वाहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याच वेळी एका मोठ्या संघाला तगडा फलंदाज नि कर्णधार सोडचिठ्ठी देणार असल्याचे समोर येत आहे. त्याचे नाव आहे, के.एल. राहुल…

Advertisement

पंजाब किंग्सची साथ सोडणार
पंजाब किंग्सचा कर्णधार नि यंदाच्या IPL 2021 मध्ये सर्वाधिक धावा करणारा राहुल पुढच्या पर्वात पंजाब किंग्सची साथ सोडणार असल्याचे समोर येत आहे. राहुलने यंदाच्या मोसमात १३ सामन्यांत ६२६ धावा केल्या, परंतु तरीही पंजाब किंग्सची घोडदौड साखळी फेरीचत संपुष्टात आली.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, अनेक फ्रँचायझींनी राहुलशी संपर्क साधला आहे. पुढील पर्वात दोन नवे संघ सहभागी होणार आहेत. मात्र, बीसीसीआयने अद्याप रिटेशन पॉलिसी जाहीर केलेली नाही. त्यामुळे किती खेळाडूंना रिटेन केलं जाणार, Right To Match कार्डचा कसा वापर होणार, याबाबत संदिग्धता आहे. मात्र, विराटच्या निर्णयानंतर आता आरसीबीच्या कर्णधार पदाची जबाबदारी राहुलवर येणार असल्याचे समजते.

Advertisement

फेसबूकनंतर आता ही सर्वात वापरली जाणारी सेवा पडली बंद, युजर्सची झालीय मोठीच अडचण..
आज सोने-चांदीचा ट्रेंड बदलला; सोन्याचे दर वाढले, चांदीही चमकली; पहा, काय आहे आजचे भाव

Advertisement
Advertisement

Leave a Reply