Take a fresh look at your lifestyle.

आता कोळशाचेही राजकारण..! राज्यांच्या तक्रारीनंतर मोदी सरकारने केला ‘हा’ दावा; पहा, नेमके काय म्हटलेय सरकारने

नवी दिल्ली : जगात अनेक देशात निर्माण झालेले विजेचे संकट भारतात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. देशात आजमितीस कोळशाची प्रचंड टंचाई जाणवत आहे. अनेक प्रकल्पात कोळशाचा साठा संपला आहे. त्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. वीज उत्पादन घटले आहे. अशीच परिस्थिती राहिली तरी ऐन सणासुदीच्या काळात अनेक राज्यात विजेचे संकट उभे राहणार आहे. त्यामुळे वीज कंपन्या वीज जपून वापरण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारांनी ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारने तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. या परिस्थितीत केंद्राने मात्र वेगळाच दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही सरकारांमध्ये समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Advertisement

सध्या कोळशाची कमतरता जाणवत असून त्याचा वीज निर्मितीवर परिणाम होईल, असे म्हणणारे केंद्रीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी आज मात्र कुठेही वीज टंचाई निर्माण होणार नाही असा दावा केला आहे. विशेष म्हणजे, कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांनीही देशात कुठे कोळसा टंचाई नाही असे ठामपणे सांगितले आहे. या मुद्द्यावरही आता जोरदार राजकारण सुरू झाले आहे.

Advertisement

याआधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया, उर्जा मंत्री सत्येंद्र जैन यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली होती. देशात कोळशाची समस्या आहे, हे आधी सरकारने मान्य करावे असे सिसोदिया म्हणाले होते. मात्र, कोरोना काळातील ऑक्सिजन प्रमाणेच आता कोळशाच्या मुद्द्यावरही राजकारण सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

Advertisement

उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, आंध्र प्रदेश या राज्यांनी कोळशाचा योग्य पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी केल्या होत्या. वीज पुरवठा बंद झाला तर उद्योग बंद पडतील, असेही सांगण्यात आले होते. या समस्यांची दखल केंद्राने घेतली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्यांना कोळसा कमी पडू देणार नाही आणि वीज कमतरता निर्माण होऊ देणार नाही असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Advertisement

दरम्यान, देशातील या कोळसा संकटावर आज राजधानी दिल्लीत पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत काहीतरी महत्वाचा निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात येत आहे.

Advertisement

देशात कोळसा टंचाईने हाहाकार; ‘या’ राज्यात मात्र 9 दिवसांत हजारो टन कोळसा गेला वाया; पहा, आता काय होतील परिणाम..?

Advertisement

वीज कंपनीचे लोकांना मेसेज, मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र; पहा, तरी राजधानीत नेमके चाललेय काय ?

Advertisement

भारताचा मास्टरस्ट्रोक..! एकाच झटक्यात चीनचा ‘तो’ प्लान केला फेल; ऑस्ट्रेलियालाही केली मदत; पहा, भारताने नेमके काय केले..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply