Take a fresh look at your lifestyle.

भाजपला एका राज्यात मोठा धक्का : परिवहन मंत्र्याचा मुलासह काँग्रेसमध्ये प्रवेश.. कोणते आहे ते राज्य..

नवी दिल्ली : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. परिवहन मंत्री यशपाल आर्य आणि त्यांचे आमदार पुत्र संजीव आर्य यांनी आज दिल्लीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

Advertisement

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला आणि राज्य प्रभारी देवेंद्र यादव यांच्या उपस्थितीत दिल्लीत पत्रकार परिषदेत याची घोषणा करण्यात आली. या वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गणेश गोडियाल आणि माजी मुख्यमंत्री हरीश रावत हेही दिल्लीत उपस्थित होते.

Advertisement

यशपाल आणि संजीव आर्य यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि राज्य प्रभारी देवेंद्र यादव यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेतली. जशी निवडणूक जवळ येईल तसे भाजपला आणखी धक्के बसतील, असे सुरजेवाला यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

यशपाल आर्य हे बाजपूरचे आमदार आहेत. त्यांचा मुलगा संजीव आर्या नैनीताल मतदारसंघातून आमदार आहे. यशपाल आर्य हे पुष्करसिंह धामी सरकारमध्ये मंत्री होते आणि त्यांच्याकडे सहा विभाग होते. ज्यात परिवहन, समाजकल्याण, अल्पसंख्यांक कल्याण, विद्यार्थी कल्याण, निवडणूक आणि उत्पादन शुल्क विभागांचा समावेश होता.

Advertisement

उत्तराखंडमध्ये भाजपाला रोखण्यासाठी काँग्रेसनेही मोर्चेबांधणी सुरु केली आहे. २०२२ मध्ये उत्तर प्रदेशसह उत्तराखंडचीही निवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसमध्ये इनकमिंग सुरु झाल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच कन्हेय्या कुमार याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आता परिवहन मंत्र्यांच्या प्रवेशाने  उत्तराखंडमध्ये भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply