Take a fresh look at your lifestyle.

अरे, आहात कुठे…! भविष्यात एकदम भन्नाट राहिल इंटरनेटचा स्पीड; पहा, केंद्र सरकारने काय सुरू केलीय तयारी..?

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी स्मार्टफोन आणि इंटरनेट हे शब्दही कुणाला माहित नव्हते. मात्र, आज या दोन गोष्टी नसतील तर.. असा विचार करणे सुद्धा शक्य नाही, असा सध्याचा काळ आहे. खिशात स्मार्टफोन नाही असा माणूस क्वचितच सापडेल. नुसता फोन असून काय उपयोग इंटरनेट पाहिजेच ना.. मग, काय इंटरनेट आधिक वेगवान होत चालले आहे. जगातील आघाडीच्या कंपन्यांनी यावर तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भविष्यात 5G पेक्षाही आधिक वेगवान गतीने इंटरनेट उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकार सुद्धा या शर्यतीत मागे राहिलेले नाही. सरकारने सुद्धा देशातील इंटरनेट सुविधेत आधिक सुधारणा करण्याच्या उद्देशाने तयारी सुरू केली आहे.

Advertisement

केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने सरकारी टेलिकॉम रिसर्च कंपनी ‘सी डॉट’ वर याबाबत जबाबदारी सोपवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दूरसंचार विभागाने 6G नेटवर्क संदर्भात आवश्यक तांत्रिक गोष्टींचा विचार करण्याच्या सूचना या कंपनीला दिल्या आहेत. त्यामुळे कंपनी आता लवकरच या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्याची शक्यता आहे.

Advertisement

सॅमसंग, हुवावे, एलजी यांसह अन्य आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्यांनी 6G नेटवर्कवर काम याआधीच सुरू केले आहे. एका अहवालानुसार, 6G तंत्रज्ञानामध्ये इंटरनेटचा वेग 5G च्या तुलनेत तब्बल 50 पट जास्त राहण्याची शक्यता आहे. सन 2028 ते 2030 पर्यंत हे तंत्रज्ञान बाजारात आलेले असेल, असे अहवालात म्हटले आहे. देशात सध्या 5G तंत्रज्ञानावर ट्रायल सुरू आहे. हे तंत्रज्ञान अद्याप देशात लाँच केलेले नाही. असे असताना सरकारने आता 6G तंत्रज्ञानासाठीही चाचपणी सुरू केली आहे.

Advertisement

आजमितीस देशात 4G तंत्रज्ञान वापरात आहे. 5G तंत्रज्ञान अजून आलेले नाही. हे तंत्रज्ञान येण्याआधीच सरकारने 6G तंत्रज्ञानाचा विचार का सुरू केला आहे, असा प्रश्न केला जात आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे, सरकारने असा निर्णय घेतला आहे, की 6G तंत्रज्ञानाच्या बाबतीत अन्य देशांच्या कंपन्यांच्या तुलनेत भारत मागे राहू नये. त्यामुळे या कामकाजात आता आधिक उशीर करणे योग्य नसल्याचे सरकारला वाटत आहे. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेत 6G तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्राथमिक कार्यवाही सुरू केली आहे.

Advertisement

बाब्बो.. भारतात सुरुये इंटरनेटचा दणका; पहा नेमके काय म्हटलेय केंद्र सरकारने

Advertisement

गावोगावी दिसणार इंटरनेटचा जलवा..! मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, पाहा गावकऱ्यांचा काय फायदा होणार..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply