Take a fresh look at your lifestyle.

विराट कोहलीने या प्रमुख कारणामुळे सोडले भारतीय टी-२० संघ आणि `आरसीबी`चे कर्णधारपद… काय असेल कारण?

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटचा स्टार फलंदाज विराट कोहलीने अलीकडेच भारतीय टी-२० संघ आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (आरसीबी) कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्याने हा निर्णय का घेतला हेही नुकतेच सांगितले

Advertisement

टी-२० विश्वचषकानंतर तो भारतीय संघाचे कर्णधारपद सोडेल आणि आयपीएलच्या या मोसमानंतर बंगळुरूच्या कर्णधारपदावरूनही तो पायउतार होईल. कोहलीच्या या निर्णयाने त्याच्या चाहत्यांची मात्र निराशा झाली आहे.

Advertisement

याबाबत कोहलीने अखेर आपले मौन सोडले आहे. कोहली म्हणाला,  कामाचा ताण हे कर्णधारपद सोडण्याचे प्रमुख कारण आहे. मी माझ्या जबाबदाऱ्यांबद्दल नेहमी प्रामाणिक असतो. मी काही कामांना १२० टक्के देऊ शकत नाही तर मी त्यांना पकडून ठेवणार नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला असे त्याने सांगितले.

Advertisement

२०१३ च्या आयपीएल हंगामात कोहलीने बंगळुरूचे कर्णधारपद स्वीकारले होते. त्याच्या आधी डॅनियल व्हिटोरी ही भूमिका साकारत होता. दरम्यान, बंगळुरूचा संघ चार वेळा प्लेऑफमध्ये पोहचला आहे आणि २०१६ मध्ये तो अंतिम फेरीत पोहोचला. या मोसमानंतर बंगळुरूच्या कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचे कोहलीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, कोहली आपल्या संघाचा विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा आणि त्यांना प्रथमच चॅम्पियन बनवण्याचा प्रयत्न करीत आहे.

Advertisement

पुढील वर्षापासून कोहली बंगळुरूचा कर्णधार नसेल तरी शेवटच्या सामन्यापर्यंत आरसीबीकडून खेळायला आवडेल, असे त्याने स्पष्ट केले आहे. बंगळुरू संघ २०२२ मध्ये होणाऱ्या मेगा-लिलावात कोहलीला कायम ठेवण्याची शक्यता आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply