Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ महत्वाच्या सामन्याआधीच बंगलोरला झटका; संघातील दोन खेळाडू आयपीएलबाहेर; पहा, काय आहे कारण

दुबई : आयपीएलमध्ये आज बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स दरम्यान सामना होणार आहे. मात्र, या सामन्याआधीच बंगलोर संघास जोरदार झटका बसला आहे. या सामन्याआधी संघातील दोन खेळाडूंनी आयपीएल सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोन खेळाडू आपल्या मायदेशी रवाना झाले आहेत. वानिंदू हसरंगा आणि दुश्मंथा चमिरा हे दोघेजण टी-२० विश्वचषकातील पात्रता सामन्यांसाठी दोघेही श्रीलंका संघात सामील होतील. आरसीबीने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

Advertisement

हसरंगा दोन सामन्यात दिसला, पण त्याला विशेष कामगिरी करता आली नाही. पहिल्याच सामन्यात ते शून्यावर आऊट झाला. दुसऱ्या सामन्यात तर फक्त एक रन केला होता. गोलंदाजीत त्याला दोन्ही सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. चमिराला मात्र एकाही सामन्यात संधी मिळाली नाही.

Advertisement

यंदा आयपीएलमध्ये बंगलोर संघाने दमदार कामगिरी केली आहे. प्ले ऑफमध्ये संघ दाखल झाला आहे. त्यानंतर आज कोलकाता विरोधात सामना होत आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्रात कोलकाता संघाची कामगिरी अतिशय निराशाजनक होती. दुसऱ्या सत्रात मात्र कोलकाताने जबदरदस्त कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या जोरावरच कोलकाताने प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. आज बंगलोर विरोधात सामना होणार आहे. दोन्ही संघांची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे आज होणारा सामना अटीतटीचा होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Advertisement

दरम्यान,

Advertisement
Advertisement

Leave a Reply