Take a fresh look at your lifestyle.

तेलाचा उडालाय भडका..! सलग सातव्या दिवशी तेल कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय; पहा, काय भाववाढीचे नेमके कारण..?

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून देशातील तेल कंपन्यांनी ऐन सणासुदीच्या काळात मनमानी निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. कंपन्यांनी आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. मागील सात दिवसांपासून इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. आज पेट्रोल 30 पैसे तर डिझेलचे दरात 35 पैशांनी वाढ केली आहे.

Advertisement

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भरमसाठ वाढल्या आहेत. सध्या ब्रेंट क्रूड तेलाच्या किमती 82 डॉलर्सच्याही पुढे गेल्या आहेत. तेलाच्या किमती वाढत असल्याचे नाइलाजाने भाववाढ करावी लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. या भाववाढीने सर्वसामान्य मात्र हैराण झाले आहेत. किमती कमी करण्याचा विचार तर सरकार आजिबात करत नाही. इंधनावर राज्य आणि केंद्र सरकारकडून जे कर आकारले जातात. त्या द्वारे सरकारला कोट्यावधींचे उत्पन्न मिळते. त्यामुळे हे करही कमी करण्याचा निर्णय सरकार घेत नाही.

Advertisement

विशेष म्हणजे, रिजर्व बँकेनेही सध्याच्या काळात इंधनावरील कर कमी करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. मात्र, बँकेच्या आवाहनाचा सरकावर काही परिणाम झाल्याचे दिसत नाही. कारण, त्यानंतरही भाववाढ सुरुच आहे. आता अनेक शहरात पेट्रोल आणि डिझेल 110 रुपयांचा टप्पा पार करण्याच्या तयारीत आहेत. काही शहरात तर पेट्रोल 110 रुपयांच्याही पुढे गेले आहे.

Advertisement

प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात इंधनाचे भाव वाढले आहे. या भाववाढीमुळे देशांतर्गत महागाईत वाढ झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर प्रचंड वाढले आहेत. एलपीजी गॅसचेही दर वाढले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात महागाईने नागरिक हैराण झाले आहेत. देशात अशी परिस्थिती असतानाही सरकार कोणताच दिलासादायक निर्णय घेण्याच्या मानसिकतेत दिसत नाही.

Advertisement

बाब्बो.. ‘या’ देशात फक्त 3 रुपयात मिळतयं पेट्रोल; कारण ऐकून होताल थक्क..!

Advertisement

बाब्बो… पेट्रोल आणायला लोकं चाललेत की नेपाळला; पहा, कुठे घडतोय ‘हा’ चमत्कारिक प्रकार

Advertisement
Advertisement

Leave a Reply