Take a fresh look at your lifestyle.

राज्यात बंदला सुरुवात.. पहा, राज्यात काय सुरू आहेत घडामोडी; आंदोलनाला कुणी दिलाय पाठिंबा..? जाणून घ्या अपडेट

मुंबई : लखीमपूर खीरी येथील हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने बंद पुकारला आहे. या बंदला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. राज्यात या बंदला प्रतिसाद मिळत आहे. अनेक शहरात सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. काही शहरातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प पडले आहेत.

Advertisement

राज्यात ठिकठिकाणी या बंदला प्रतिसाद मिळत आहे. कोल्हापूर शहरात आज सकाळपासून भाजी मार्केट आणि दुकाने बंद आहेत. नाशिक शहरातील बाजार समितीमधील व्यवहार आज बंद ठेवण्यात आले आहेत. ठाणे शहरातील परिवहन सेवा आज बंद राहणार आहे. बेस्ट कामगार सेनेने बंदला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे नोकरदार मंडळींना फटका बसणार आहे. आज आगारातून एकही बस सोडलेली नाही, अशी माहिती आहे. या बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील काही दुकाने बंद राहणार असल्याचे समजते.

Advertisement

सोलापूर शहरात या बंदला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसत आहे. शहर आणि जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक सुरळीत सुरू आहे. अन्य दैनंदीन व्यवहारही नेहमीप्रमाणे सुरू आहेत. नाशिक मधील लासलगाव कांदा मार्केट आज कडकडीत बंद आहे. व्यापाऱ्यांनी बंदला शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे. नगर जिल्ह्यातही बंदला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवल्याचे दिसत आहे.

Advertisement

या बंदला पुणे व्यापारी महासंघानेही पाठिंबा दिला आहे. मुंबईतील डबेवाला असोसिएशनने पाठिंबा जाहीर केला आहे. तर दुसरीकडे ठिकठिकाणी आंदोलनेही सुरू आहेत. आघाडी सरकारमधील घटक पक्ष काँग्रेसने आज राजभवना जवळ मौनव्रत आंदोलन केले. राज्यातील रुग्णालये, रुग्णवाहिका,  आरोग्य सेवेसंबंधित आस्थापना, वाहतूक, सरकारी कार्यालये आणि स्वच्छता यंत्रणा यांना बंदमधून वगळले आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सुद्धा बंद मध्ये सहभागी असणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

दरम्यान, या मुद्द्यावर राज्यातील राजकारण सुद्धा तापले आहे. विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजप, मनसे या पक्षाच्या नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. देशात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्ष बंदचे आवाहन करत आहे. कोरोना काळातील लोक संकटात असताना बंद लादला जात आहे. लोकांचे नुकसान कोण भरून देणार, असा प्रश्न भाजप नेते राम कदम यांनी उपस्थित केला आहे. राज्यातले सत्ताधारी आणि देशातले विरोधक राजकारण करत असल्याची टीका कदम यांनी केली.1

Advertisement

महत्वाची बातमी : म्हणून 11 ऑक्टोबरला अख्खा महाराष्ट्र बंद..! पहा नेमके काय चालू राहणार ते

Advertisement
Advertisement

Leave a Reply