Take a fresh look at your lifestyle.

घरात धूळखात पडलेले सोने ‘या’ स्किममध्ये गुंतवा नि कमवा रग्गड पैसा..

भारतीयांनी सोन्याची आवड कायम राहिलेली आहे. अनेकदा गुंतवणूक म्हणून सोनेखरेदी केली जाते. सणवाराला हे सोने अंगावर घालून मिरवले जाते, नाहीतर वर्षभर घरातील कपाटात वा बॅंकेच्या लाॅकरमध्ये हे सोने धूळखात पडलेले असते. त्यापासून कमाई तर काही होत नाही, उलट लाॅकरचे भाडे भरावे लागत असल्याने खिशाला झळ बसते.

Advertisement

घरातील असे पडून असलेल्या सोन्यातूनही तुम्ही मोठ्या प्रमाणात कमाई करु शकता. देशातील सर्वात मोठी बॅंक असणाऱ्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने त्यासाठी एक योजना आणलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून धूळखात पडलेल्या सोन्यातून कमाई करता येणार आहे. एसबीआयच्या या योजनेचे नाव आहे, ‘रिव्हॅम्पड गोल्ड डिपॉझिट योजना, म्हणजेच आर-जीडीएस (SBI Revamped Gold Deposit Scheme)..

Advertisement

स्टेट बँक ऑफ इंडियाची ही योजना मुदत ठेवीप्रमाणे (Fixed Deposit) काम करते. या योजनेअंतर्गत ग्राहक त्यांचे सोने जमा करून व्याजाच्या स्वरूपात कमाई करु शकतात. याबाबतची सर्व माहिती ‘एसबीआय’च्या वेबसाइटवरही देण्यात आली आहे. या योजनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

Advertisement

एसबीआयच्या ‘रिव्हॅम्पड गोल्ड डिपॉझिट योजनेत विविध प्रकारे गुंतवणूक करता येते. स्वतंत्र व्यक्तीप्रमाणे प्राॅपराइटर आणि पार्टनरश‍िप फर्म, एचयूएफ (हिंदू अविभाजित परिवार), सेबीमध्ये रजिस्‍टर्ड म्युच्युअल फंड/ एक्सचेंज-ट्रेडेड फंड आणि कंपन्या, धर्मार्थ संस्थान किंवा सेंट्रल आणि स्‍टेट गव्हर्नमेंटच्या मालकी हक्काखालील यूनिट्सही या योजनेत गुंतवणूक करू शकतात.

Advertisement

किती सोने जमा करता येईल..?
या योजनेत कमीत कमी 10 ग्रॅम कच्चे सोने (बार, नाणी, दागिने, विशिष्ट खडे आणि धातू वगळता) जमा करता येईल. जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी मात्र कोणतीही मर्यादा नाही.

Advertisement

कशी करणार गुंतवणूक..?
1) शॉर्ट टर्म बँक डिपॉझिट (STBD)- कालावधी 1 ते 3 वर्ष
2) मीडियम टर्म गव्हर्नमेंट डिपॉझिट (MTGD)- कालावधी 5-7 वर्ष
3) लाॅंग टर्म गव्हर्नमेंट डिपॉझिट (LTGD)- कालावधी 12-15 वर्ष

Advertisement

व्याज किती मिळणार..?
– STBD वरील व्याज-  0.50 टक्के (1 वर्ष), 0.55 टक्के (1 ते 2 वर्षांपर्यंत), 0.60 टक्के (2 ते 3 वर्षांपर्यंत).
– MTBD वरील व्याज- 2.25 टक्के (1 वर्ष),
– LTGD वरील व्याज- 2.50 टक्के (प्रति वर्ष)

Advertisement

रिपेमेंटची प्रक्रिया
एसटीबीडी योजनेत सोन्यासाठीची रक्कम एकतर सोन्याच्या स्वरुपात किंवा मॅच्युरिटीच्या तारखेला असणाऱ्या समकक्ष किंमतीत घेण्याचा पर्याय मिळेल.
MTGD आणि LTGDसाठी ठेवीची पूर्तता सोन्यामध्ये किंवा सध्याच्या प्रचलित किमतीनुसार सोन्याच्या मुल्याएवढ्या असेल. तथापि, गोल्ड रिडम्पशन झाल्यास 0.20% प्रशासकीय शुल्क आकारले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

राज्यात बंदला सुरुवात.. पहा, राज्यात काय सुरू आहेत घडामोडी; आंदोलनाला कुणी दिलाय पाठिंबा..? जाणून घ्या अपडेट
अर्र.. चीन-पाकिस्तान तेथून पळाले..! त्यांना घाबरुन घेतला हा; धक्कादायक निर्णय; चीनला बसणार अब्जावधींचा फटका

Advertisement
Advertisement

Leave a Reply