Take a fresh look at your lifestyle.

कोरोना पाठोपाठ ‘त्या’ आजाराचे थैमान; ‘या’ राज्यांतील परिस्थिती होतेय आधिक बिकट..

नवी दिल्ली : मागील दोन वर्षांपासून कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. अजूनही या आजाराचा धोका कायम आहे. देशात कोरोनाचा वेग कमी झाला असला तरी सणासुदीच्या काळात आधिक अलर्ट राहण्याचे आवाहन सरकारने केले आहे. देश कोरोना संकटाचा सामना करत असताना दुसरे काही आजार समोर येत आहेत. या नव्या आजाराने उत्तर भारतातील काही राज्यात थैमान घातले आहे. कोरोनाच्या संकटातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असताना या व्हायरल आजारांना आरोग्य यंत्रणेसमोर नवे आव्हान उभे केले आहे.

Advertisement

उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यात परिस्थिती सातत्याने खराब होत आहे. मध्य प्रदेशात नवीन रुग्ण संख्येत वेगाने वाढ होत आहे. एकट्या ग्वालियर जिल्ह्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या पाचशेपर्यंत पोहोचली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यात रुग्णांची संख्याा वेगाने वाढली आहे. राजधानी दिल्ली शहरातही या आजाराचा प्रकोप वाढला आहे. या वर्षात ऑक्टोबरपर्यंत डेंग्यूचे 480 प्रकरणे समोर आली आहेत. ऑक्टोबर महिन्यात रुग्ण वाढीचा वेग जास्त राहिला आहे.

Advertisement

मध्य प्रदेशातील ग्वालियर जिल्ह्यात डेंग्यूचा प्रादुर्भाव जास्त आहे. त्यामुळे या शहरातील 66 वॉर्डांमध्ये विशेष पथके तयार केली आहेत. नागरिकांच्या घरोघर जाऊन सर्वे करण्यात येत आहे. पीटीआय वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार, दिल्ली शहरात डेंग्यूचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. दोन ऑक्टोबरपर्यंत रुग्णसंख्या 341 होती मात्र, मागील एक आठवड्याच्या काळातच 140 नवे रुग्ण आढळले आहेत. संबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षात सप्टेंबर महिन्यात एकूण 217 प्रकरणे आढळली आहेत. मागील तीन वर्षात या काळातील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

Advertisement

रिपोर्टनुसार, राजधानी दिल्लीमध्ये या वर्षात 9 ऑक्टोबरपर्यंत डेंग्यूचे एकूण 480 प्रकरणे आढळून आली. सन 2018 नंतरची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. या आजाराचे रुग्ण वाढत चालले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेचे टेन्शन वाढले आहेत. सध्या देशात ठिकठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे या आजाराचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत आजार वाढू नये, यासाठी संबंधित राज्यांच्या आरोग्य विभागाद्वारे आवश्यक नियोजन करण्यात येत आहे.

Advertisement

सावधान! कोरोनापाठोपाठ आता ‘त्या’ आजाराचा कहर…रूग्णालयातील परिस्थिती गंभीर..वाचा

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply