Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. चीन-पाकिस्तान ‘तेथून’ पळाले..! ‘त्यांना’ घाबरुन घेतला ‘हा’ धक्कादायक निर्णय; चीनला बसणार अब्जावधींचा फटका

नवी दिल्ली : पाकिस्तान मध्ये चीनचा हस्तक्षेप सातत्याने वाढत चालला आहे. आपल्या महत्वाकांक्षी सीपीइसी प्रकल्पात चीनने पाण्यासारखा पैसा ओतला आहे. तसेच या प्रकल्पाच्या नावाखाली पाकिस्तानला अब्जावधींचे कर्ज दिले आहे. असे असतानाही हा प्रकल्प चीनला काही फायद्याचा ठरताना दिसत नाही. आता तर या प्रकल्पाच्या संबंधित एक धक्कादायक निर्णय चीन आणि पाकिस्तानने घेतला आहे. या निर्णयामुळे चीनचे मात्र मोठेच नुकसान होणार आहे. मात्र, हा निर्णय घेण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरा पर्यायही शिल्लक नव्हता.

Advertisement

पाकिस्तान मधील सर्वात अशांत असलेल्या बलुचिस्तान प्रांतात सातत्याने घडणाऱ्या घडामोडींमुळे दोन्ही देशांनी हा निर्णय घेतला आहे. या प्रांतात वारंवार होणाऱ्या हमल्यांना घाबरुन चीन आणि पाकिस्तानने ग्वादर बंदराला चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर केंद्र म्हणून विकसित करण्याचा निर्णय आता बाजूला ठेवल्याची माहिती आहे. या ऐवजी आता कराची बंदर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून दोन्ही देशांनी तसा करारही केला आहे.

Advertisement

जपानी वृत्तपत्र निक्केईने याबाबत वृत्त दिले आहे. यामध्ये म्हटले आहे, की पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी चीन तब्बल साडेतीन अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानेही या वृत्तास दुजोरा दिला आहे. या प्रकल्पात कराची बंदाराचा विकास, मासेमारीसाठी आणखी एक बंदर निर्मिती आणि साडे सहाशे हेक्टर परिसरात व्यापारी झोन निर्मिती अशी कामे या प्रकल्पांतर्गत होणार आहेत.

Advertisement

तसे पाहिले तर, बलुचिस्तान मधील ग्वादर बंदर हे चीनसाठी डोकेदुखी ठरले होते. येथे बलुच बंडखोर सातत्याने हमले करत होते. या घटनांमध्ये चीनला मोठे नुकसान सहन करावे लागले. अनेक वेळा सांगूनही पाकिस्तानने काहीच कार्यवाही केली नाही. यामुळे चिनी कंपन्या नाराज होत्या.

Advertisement

पाकिस्तान काहीच करत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आता चीनने या प्रकल्पाचा नाद सोडला आहे. हा प्रकल्प कराचीला सुरू केला जाणार असला तरी प्रत्यक्षात अंमलबजावणी मात्र कठीण ठरणार आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. फक्त चीनच नाही तर सौदी अरेबियानेही ग्वादर येथील तेल शुद्धीकरण प्रकल्प कराची येथे नेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तान सरकारला मोठा झटका बसला आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply