Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या दरात आज कपात, चांदीची चमक मात्र वाढली; पहा, काय आहेत सोने मार्केटमधील अपडेट

मुंबई : सध्या सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एक चांगली बातमी आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याचे दर घटले आहेत. सोने मार्केटमध्ये आज सोन्याचे दर 14 रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे सोन्याचे दर सध्या 46 हजार 966 रुपये प्रति दहा ग्रॅम असे ट्रेंड करत आहेत. 22 कॅरेट सोन्याचे भाव 43 हजार 21 रुपये असे झाले आहेत. चांदीच्या दरात मात्र आज वाढ नोंदवण्यात आली. चांदीचे दर 295 रुपयांनी वाढले आहेत, त्यामुळे आता चांदी 61 हजार 375 रुपये प्रति किलो असे दर आहेत.

Advertisement

जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम सोने मार्केटवर झाला आहे. सप्टेंबर महिन्यात सोन्याचे भाव जास्त कमी झाले होते. त्यानंतर काही प्रमाणात भाव पुन्हा वाढले आहेत. तरीही सप्टेंबर महिन्यातील 45 हजार 700 रुपयांच्या तुलनेत सध्या सोन्याचे भाव जास्त आहेत.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते.

Advertisement

त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजारांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. परिस्थितीत बदल होत असल्याने सोने लवकरच 50 हजारांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

गुडरिटर्न्स वेबसाइटनुसार, राजधानी आज दिल्ली शहरात 24 कॅरेट सोन्याचे भाव 50 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम असे आहेत. 22 कॅरेटसाठी 46 हजार 060 रुपये भाव आहे. मुंबई शहरात 24 कॅरेटसाठी 46 हजार 940 रुपये तर 22 कॅरेटसाठी 45 हजार 940 रुपये दर आहे. कोलकाता शहरात 24 कॅरेटसाठी 49 हजार 100 रुपये तर 22 कॅरेटसाठी 46 हजार 400 रुपये भाव आहे. चेन्नई शहरात 24 कॅरेटसाठी 48 हजार  210 रुपये तर 22 कॅरेटसाठी 44 हजार 190 रुपये प्रति दहा ग्रॅम असे दर आहेत.

Advertisement

घरात धूळखात पडलेले सोने ‘या’ स्किममध्ये गुंतवा नि कमवा रग्गड पैसा..

Advertisement

सोन्याचे दरात आज घडलाय ‘हा’ चमत्कार; जाणून घ्या, काय आहेत आज सोने-चांदीचे दर

Advertisement
Advertisement

Leave a Reply