Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण, पाहा आठवड्याची सुरुवात कशी झालीय..?

मुंबई : जगातील शेअर बाजारांमध्ये तेजीचे वातावरण आहे. कोरोनातून सावरत भारतातही स्थिती सावरत असल्याने गुंतवणूकदारांचा बाजारावरील विश्वास वाढत आहे. सण-उत्सवांचा काळ असल्याने बाजारात चैतन्य परतले आहे. आगामी काळातही असेच उत्सवी वातावरण राहणार असल्याने मोठ्या व किंमती वस्तूंची खरेदी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे वाहन, वस्त्रोद्योग, बांधकाम क्षेत्रांवर लक्ष देणे फायद्याचे ठरू शकते.

Advertisement

दरम्यान, आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज (सोमवारी) शेअर बाजाराची सुरुवात काहीशी कमकुवत झाली होती. मात्र, त्यानंतर काही काळातच बाजारात रिकव्हरी आली आणि बाजार सध्या ग्रीन मार्कवर आहे. निर्देशांकाने पुन्हा एकदा उच्चांकी पातळी गाठली. निफ्टी 30 पेक्षा जास्त अंकांच्या वाढीसह 17900 च्या वर ट्रेड करीत आहे. त्याचबरोबर सेन्सेक्समध्ये 60 हजारांच्या पातळीवर होता.

Advertisement

जागतिक बाजारातही संमिश्र संकेत मिळताना दिसत आहेत. आशियातील NIKKEI मध्ये 1% पेक्षा जास्त वाढ झाली. JEFFERIES ने RELIANCE IND वर खरेदीचे रेटिंग दिले आहे आणि 2,580 रुपयांवरून 3,050 रुपयांचे लक्ष्य निश्चित केले आहे.

Advertisement

कंपनीने $ 77.1 कोटी मध्ये REC सोलर होल्डिंग्स विकत घेतली. त्यांनी आपल्या टार्गेटमध्ये सोलर बिझनेसचा समावेश केला आहे. त्यानंतर, आर्थिक वर्ष 2022 मध्ये O2C EBITDA मध्ये 10-12% ची सुधारणा शक्य आहे. REC अधिग्रहण कंपनीसाठी जागतिक बाजारपेठ खुली करेल.

Advertisement

Aditya Birla Sun Life AMC ची आज लिस्टिंग होणार आहे. त्याचा IPO साडेपाच पट असून, इश्यू प्राईस 712 रुपये आहे.

Advertisement

विराट कोहलीने या प्रमुख कारणामुळे सोडले भारतीय टी-२० संघ आणि `आरसीबी`चे कर्णधारपद; काय असेल कारण?
घरात धूळखात पडलेले सोने या स्किममध्ये गुंतवा नि कमवा रग्गड पैसा..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply