Take a fresh look at your lifestyle.

अर्र… ‘त्या’ युद्धात चीनने अमेरिकेचा केलाय पराभव; पहा, कुणी केलाय ‘हा’ धक्कादायक खुलासा; चीनचा कारनाम्याने अमेरिका हैराण

वॉशिंग्टन : जागतिक महासत्ता म्हणून मिरवणाऱ्या अमेरिकेच्या वर्चस्वाला चीनने जबरदस्त झटके देण्यास सुरुवात केली आहे. कधीकाळी अमेरिकेच्या हिशोबात नसणारा कम्युनिस्ट चीन आज अनेक बाबतीत अमेरिकेला आव्हान देत आहे. इतकेच काय, तर टेक्नॉलॉजीच्या प्रांतात चीनने अमेरिकेला केव्हाच मागे टाकले आहे. खुद्द अमेरिकेतील माजी अधिकाऱ्यानेच हा धक्कादायक खुलासा केला आहे. अमेरिकी रक्षा मंत्रालयाचे माजी सॉफ्टवेअर प्रमुख निकोलस चैलान यांनी सांगितले, की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात चीनने आता मोठी आघाडी घेतली आहे. या क्षेत्रात आता चीनच्या विरोधात अमेरिका पराभूत होताना दिसत आहे.

Advertisement

सायबर क्षमतेमध्ये वाढ केल्यामुळे चीन अमेरिकेच्या पुढे गेला आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चीनचा जगभरात दबदबा निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. चीनने सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सिंथेटीक बायोलॉजी आणि जेनेटीक्स क्षेत्रात आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, मागील दशकभराच्या काळातच चीनने हे यश मिळवले आहे. तर दुसरीकडे अमेरिका याबाबतीत मागे पडत आहे. अशीच परिस्थिती कायम राहिली तर पुढील 15 ते 20 वर्षांच्या काळात चीनचा सामना करण्याच्या स्थितीत अमेरिका राहणार नाही, असा गंभीर इशारा त्यांनी यावेळी दिला.

Advertisement

चिनी कंपन्या सरकारबरोबर समन्वय साधत तंत्रज्ञानावर कामकाज करत आहेत. मात्र, अमेरिकेत असे होत नाही. त्यामुळे सुद्धा तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीन अतिशय वेगाने प्रगती करत आहे. त्यामुळे आता अमेरिका मागे पडत असल्याचे स्पष्ट होत आहे, असे त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

Advertisement

दरम्यान, अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढत चालला आहे. तैवानच्या मुद्द्यावर चीनने अमेरिकेला धमकी सुद्धा दिली आहे. मात्र, अमेरिकेने तैवानला समर्थन देणे अद्यापही कायम ठेवले आहे. कोरोना विषाणूच्या मुद्द्यावर सुद्धा अमेरिकेने चीनची कोंडी केली आहे. त्यामुळे चीनचा तिळपापड झाला आहे. चीनने अमेरिकेला घेरण्याची रणनिती तयार केली आहे. त्यामुळे या दोन्ही देशांतील तणाव वाढत चालला आहे.

Advertisement

म्हणून अमेरिका भडकलीय चीनवर; भारताकडे अध्यक्षपद असल्याने चर्चेकडे लागले जगाचे लक्ष

Advertisement

अर्र.. अमेरिकेला चीनी समुद्रात बसलाय ‘असाही’ झटका; पहा नेमके काय झालेय पाणबुडीत

Advertisement

 

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply