Take a fresh look at your lifestyle.

एअर इंडियापाठोपाठ आता आणखी दोन सरकारी कंपन्यांचे खासगीकरण; कोणत्या आहेत त्या कंपन्या?

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना खाजगी हातात देण्याच्या केंद्राच्या मोहिमेला वेग आला आहे. एअर इंडियापाठोपाठ आता आणखी दोन सरकारी कंपन्यांचे केंद्र सरकारकडून खासगीकरण केले जाण्याची शक्यता आहे. डिसेंबरपर्यंतच हा निर्णय होऊ शकतो.

Advertisement

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (डीआयपीएएम) विभागाचे सचिव तुहिनकांत पांडे म्हणाले,  दोन दशकांच्या पहिल्या खासगीकरणातून मिळालेले धडे सरकारच्या खासगीकरण मोहिमेला गती देण्यासाठी मदत करतील. सरकारला शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि पवन हंस या सरकारी कंपन्यांचेही खासगीकरण करायचे आहे. या व्यतिरिक्त सरकार स्टॉक एक्सचेंजवर एलआयसीच्या मेगा लिस्टिंग तसेच मार्च तिमाहीत बीपीसीएल आणि बीईएमएलचे खासगीकरण करण्याचाही विचार करत आहे.

Advertisement

नीलाचल इस्पात आणि सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स अशी खासगीकरण होणाऱ्या त्या दोन कंपन्यांची नावे असून त्यांच्याशी संबंधित व्यवहार डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

टाटा सन्सने एअर इंडियाच्या विक्रीसाठी बोली जिंकल्यानंतर आता अन्य तोट्यात चाललेल्या सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा मार्ग सोपा होईल, असे म्हटले जाते. टाटा सन्स युनिटने एअर इंडियासाठी 18, 000 कोटी रुपयांची बोली जिंकली. स्पाईसजेटचे संस्थापक अजय सिंह यांच्या नेतृत्वाखालील संघही एअर इंडिया खरेदी करण्याच्या शर्यतीत होते. त्यांच्या बाजूने 15, 000 कोटी रुपयांची बोली लागली होती.

Advertisement
Advertisement

Leave a Reply