Take a fresh look at your lifestyle.

भारताचा मास्टरस्ट्रोक..! एकाच झटक्यात चीनचा ‘तो’ प्लान केला फेल; ऑस्ट्रेलियालाही केली मदत; पहा, भारताने नेमके काय केले..?

नवी दिल्ली : जगात आपला दरारा निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चीनला भारताने पुन्हा एकदा जबरदस्त झटका दिला आहे. चीनच्या कुरापतींना भारताने त्याच्यात भाषेत उत्तर दिले आहे. विशेष म्हणजे, चीनला झटका देतानाच भारताने ऑस्ट्रेलियाला सुद्धा संकटातून बाहेर काढले आहे. भारताच्या या कामगिरीने चीनचा चांगलाच तिळपापड होणार आहे. कारण, ऑस्ट्रेलियाला अद्दल घडवण्याच्या उद्देशानेच चीनने ऑस्ट्रिलेयाची कोंडी करणारा निर्णय घेतला होता. पण, ऐनवेळी भारताने एन्ट्री घेत चीनचा साराच प्लान उधळून लावला आहे.

Advertisement

सध्या चीनमध्ये विजेचे मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक प्रांतात वीज नसल्याने हाहाकार उडाला आहे. चीनमधील 70 टक्के प्रकल्प कोळशाद्वारे वीज निर्मिती करतात. मात्र, सध्या चीनमध्ये कोळसाच शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे विजेचे भीषण संकट निर्माण झाले आहे. त्याबरोबरच महागाईत सुद्धा वाढ होत आहे. अशा परिस्थितीतही चीनने ऑस्ट्रेलियाकडून कोळसा खरेदी केला नाही. उलट वेगळाच प्लान तयार केला होता. चीन आधीपासूनच ऑस्ट्रेलियाकडून कोळसा खरेदी करत आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत या दोन्ही देशात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे यावेळी ऑस्ट्रेलियाला धडा शिकवण्यासाठी चीनने कोळसा खरेदी केला नाही. चीनच्या या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियाची मोठी अडचण झाली.

Advertisement

ऑस्ट्रेलियाची माल वाहतूक करणारी जहाजे चीनमध्येच अडकून पडली. चीन कोळसा खरेदी करेल असे त्यांना वाटत होते. पण, तसे काही घडले नाही. अशा पद्धतीने बाजी चीनच्या हातात आलेली असतानाच भारताने नवा प्लान तयार केला. भारताने तातडीने हालचाली करत हा सारा कोळसा खरेदी करुन टाकला. भारताच्या या कारवाईने चीनचा सगळाच प्लान एकाच झटक्यात संपुष्टात आला.

Advertisement

भारताने जवळपास 20 लाख टन कोळसा ऑस्ट्रेलियाकडून खरेदी केला आहे. भारताच्या या निर्णयामुळे ऑस्ट्रेलिया सुद्धा संकटातून बाहेर पडला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाची मदत केली कारण, मागील काही दिवसांपासून ऑस्ट्रेलिया चीनच्या कारवायांना सातत्याने विरोध करत आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाचा विदेश व्यापार चीनवरच जास्त अवलंबून आहे. ऑस्ट्रेलियाकडून होणाऱ्या एकूण निर्यातीत 31 टक्के निर्यात चीनला होते. या व्यापारामुळे ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेस मोठी मदत होते. याचाच फायदा घेत चीनने ऑस्ट्रेलियास त्रास देण्यास सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया सुद्धा व्यापाराचा विचार न करता वेळोवेळी प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे या दोन्ही देशांतील तणाव वाढला आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply