Take a fresh look at your lifestyle.

चीननंतर आता भारतावर आलेय नवे संकट; तर ‘ही’ चार राज्य अंधारात..!

नवी दिल्ली : चीननंतर भारत आता अभूतपूर्व वीज संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. कोळशाचा साठा अवघा दोन ते चारच दिवस पुरेल इतकाच शिल्लक राहिल्याने देशातील एकूण 135 कोळशावर आधारित वीज निर्मिती केंद्रांपैकी निम्म्याहून अधिक केंद्रातील वीज निर्मिती ठप्प होण्याची शक्यता आहे.

Advertisement

चीनमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वीच वीज संकट आले होते. त्यानांतर आता भारतावर हे संकट घोंगावू लागले आहे. आपल्या देशात जवळपास 70 टक्के वीज कोळशापासून तयार केली जाते. ऐन सणांच्या हंगामातच हा प्रकार घडत आहे. याच काळात विजेची मागणी अधिक असते. सध्या देशात औद्योगिक आणि घरगुती दोन्ही विजेचा वापर उच्च पातळीवर आहे. असे नाही की हे संकट अचानक उद्भवले आहे. कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरल्याने देशभर विजेची मागणी झपाट्याने वाढली. केवळ मागील दोन महिन्यांत 2019 च्या समान कालावधीच्या तुलनेत (प्री-कोविड) विजेच्या वापरामध्ये सुमारे 17 टक्के वाढ झाली आहे. याच काळात जागतिक कोळशाच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या. त्यामुळे भारतातील कोळशाची आयात दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आली.

Advertisement

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा कोळसा आयात करणारा आणि चौथा सर्वात मोठा स्टॉकहोल्डर असलेल्या भारताकडे सध्या पुरेसा साठा नाही. केंद्रीय विद्युतप्राधिकरण (सीईए) च्या आकडेवारीनुसार देशातील 135 कोळशावर चालणाऱ्या वीज प्रकल्पांपैकी निम्म्याहून अधिक ठिकाणी सप्टेंबरच्या शेवटी फक्त चार दिवसांचा कोळसा साठा होता.

Advertisement

ऑगस्टच्या सुरुवातीला ते सरासरी 13 दिवस चालले होते. सध्याच्या कोळशाच्या संकटाला तोंडदेणे हे आशियातील तिसऱ्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेसाठी मोठे आव्हान आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे अनेक वीजनिर्मिती केंद्रांमधील उत्पादन थांबले आहे. त्याची उष्णता काही राज्यांमध्येही जाणवत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये वीज कंपनीचे संदेशही कोळशाच्या कमतरतेमुळे काही तास वीज कपातीसाठी तयार राहण्यासाठी ग्राहकांकडे येऊलागले आहेत. काही राज्यांमध्ये अघोषित वीज कपात यापूर्वीच सुरू झाली आहे आणि जरसंकट दूर झाले नाही तर ही परिस्थिती इतर राज्यांमध्येही लवकरच येणार आहे.

Advertisement

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी कोळसा संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हस्तक्षेप करण्याची विनंती करणारे पत्र लिहिले आहे. पंजाबमधील पटियालासारख्या शहरांना 4 ते 4 तास वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. कोळशाच्या कमतरतेमुळे उत्तर प्रदेशात सुरू असलेले वीज संकट येत्या काही दिवसात आणखी गंभीर होऊ शकते. पॉवर कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांच्या मते 15 ऑक्टोबरपूर्वी कोळशाच्या पुरवठ्यात कोणतीही सुधारणा नाही. आर्द्रता आणि विजेची वाढती मागणी यामुळे राज्याच्या ग्रामीण भागातून शहरीभागापर्यंत तीव्र वीजपुरवठा खंडित होत आहे. ग्रामीण भागात 4 ते 5 तास तर शहरीग्राहकांनाही अघोषित तास वीज संकटाला सामोरे जावे लागते.

Advertisement

राजस्थान गेल्या तीन महिन्यांपासून या संकटाशी झुंज देत आहे. त्यामुळे राजधानी जयपूरसह राज्यातीलअनेक जिल्ह्यांमध्ये काही ठराविक तास वीज पुरवठा खंडित केला जात आहे. मध्य प्रदेशातही कोळशाच्या कमतरतेमुळे वीज पुरवठा प्रभावित होण्याचा धोका आहे. अनेक वीज प्रकल्पांनी एकतर उत्पादन बंद केले आहे किंवा पूर्ण क्षमतेने उत्पादन करत नाही. याबाबत राज्याचे ऊर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर म्हणाले, कोल इंडियाला थकबाकी भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  राज्यात विजेची कमतरता भासणार नाही. परंतु, नवरात्रीच्या काळात त्याची भीती नाकारता येत नाही. गेल्या वर्षी 6 ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशात 15 लाख 86 हजार टन कोळसा साठा होता. या वर्षी 6 ऑक्टोबर रोजी केवळ 2 लाख 31 हजार टन कोळसा शिल्लक होता.

Advertisement
Advertisement

Leave a Reply