Take a fresh look at your lifestyle.

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना मिळालाय यलो अलर्ट; पहा, कुठे आहे पावसाचा अंदाज; नगरमध्ये जोरदार पाऊस

पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. राजस्थान, गुजरातसह उत्तरेकडील काही राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. आज राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्हे वगळता सर्वत्र येलो अलर्ट जारी केला आहे. आज सकाळपासूनच पुणे, नाशिक, नगर, धुळे, सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, परभणी आणि नांदेड या दहा जिल्ह्यांत ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली. दुपारच्या सुमारास नगर शहरात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडला.

Advertisement

भारतीय हवामान शास्त्र विभागाने आज सहा जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट दिला आहे. आज राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर होता. उद्यापासून मात्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. उद्या पुण्यासह मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. बुधवारी 13 ऑक्टोबर रोजी राज्यात कोरडे हवामान राहणार असून यादिवशी हवामान खात्याने कोणताही इशारा दिला नाही.

Advertisement

दरम्यान, यावेळी देशभरात अनेक राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. काही राज्यात तर परतीचा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुुळे आणखी काही दिवस पाऊस होणार आहे. चक्री वादळांच्या प्रभावानेही अनेक ठिकाणी पाऊस पडला होता. या पावसाने मात्र मोठे नुकसान केले आहे. पिकांचे नुकसान झाले. नागरिकांनाही या पावसाचा फटका बसला. अजूनही काही राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. एकूणच, यावेळी भरपूर पाऊस पडल्याचे दिसत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply