Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून चीनने टाकला रिव्हर्स गिअर; पहा कोणत्या मुद्द्यावर टाकलीय नांगी..!

दिल्ली : चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शनिवारी सांगितले की तैवानसोबत पुन्हा एकत्र येत शांततेने राजकीय संबंध सुधारण्यात येतील. यापूर्वी चीनने तैवानवर हल्ला करण्याची धमकी दिली होती. जीनिपिंग यांनी बीजिंगच्या ग्रेट हॉल ऑफ द पीपल येथे एका अधिकृत समारंभात सांगितले की, “चीन आता तैवान या राष्ट्राशी शांततेने पुन्हा एकत्र येईल, जे प्रत्येकाच्या हिताचे आहे.”

Advertisement

चीन सध्या शेवटच्या शाही राजवंशाचा अंत झालेल्या क्रांतीची 110 वी जयंती साजरी करत आहे. राजधानी बीजिंगमधील ग्रेट हॉल ऑफ द पीपलमध्ये बोलताना जिनपिंग म्हणाले की, “तैवानचे स्वातंत्र सैन्य हे चीनशी एकत्रीकरणात सर्वात मोठा अडथळा होता. जे लोक आपला वारसा विसरतात, मातृभूमीचा विश्वासघात करतात. आणि देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न करतात. ते कधीही चांगले करणार नाहीत. त्यांनी पुढे म्हटले की, ‘वन कंट्री टू सिस्टीम’ धोरणाअंतर्गत ते शांतपणे तैवानला आपल्या देशाशी जोडतील. हे हाँगकाँगमध्ये वापरल्या जाणाऱ्या धोरणाप्रमाणे आहे. या व्यवस्थेला साधारणपणे तैवानने विरोध केला आहे.

Advertisement

जिनपिंग यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा तैवानमध्ये लष्करी तणाव वाढत आहे. अध्यक्षांनी यापूर्वी म्हटले होते की, तैवानचा मुद्दा चीनच्या अंतर्गत प्रकरणांपैकी एक आहे आणि त्यांचा देश बाहेरून हस्तक्षेप सहन करणार नाही. पण आता अमेरिकेच्या वक्तव्यानंतर चीनचे वर्तन मवाळ झाले आहे. जिनपिंग म्हणाले की, 1949 मध्ये गृहयुद्धाच्या काळात तैवान आणि चीन वेगळे झाले. कम्युनिस्ट नेते माओ त्से तुंग सत्तेवर आल्यापासून तैवान स्वतंत्र राष्ट्र म्हणून कार्यरत आहे. परंतु बीजिंगने त्याचे सार्वभौमत्व वारंवार नाकारले आहे.

Advertisement

आता चीनने शक्ती वापरण्याचा पर्याय स्वीकारण्याविषयी अनेकदा वक्तव्य केले आहे. बीजिंगने संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांवर दबाव टाकून तैवानला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे. “तैवानचा अलगाववाद हा मातृभूमीच्या पुन्हा एकत्र येण्यात सर्वात मोठा अडथळा आहे,” असे सांगून ते म्हणाले की, स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्यांचा इतिहास निषेध करेल.

Advertisement
Advertisement

Leave a Reply