Take a fresh look at your lifestyle.

भारताच्या मित्राने तालिबानबाबत घेतला ‘हा’ धक्कादायक निर्णय; अमेरिकेलाही दिलाय जोरदार झटका

मॉस्को : अफगाणिस्तान मधील तालिबान सरकारबाबत जगातील अनेक देश आजही गोंधळात आहेत. या सरकारला मान्यता द्यायची किंवा नाही, हा मोठा प्रश्न आहे. अमेरिकेसह अन्य देश सध्यातरी मौन बाळगून आहेत. दुसरीकडे मात्र, रशियाने तालिबानबाबत धक्कादायक निर्णय घेत अमेरिकेची कोंडी केली आहे. 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या अफगाणिस्तान प्रारुप बैठकीत रशिया तालिबानच्या प्रतिनिधींना आमंत्रित करणार आहे. टीएसएसएस वृत्तसंस्थेने याबाबत रिपोर्ट प्रकाशित केला आहे. त्यामध्ये म्हटले आहे, की अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर प्रस्तावित प्रारुप बैठकीसाठी तालिबानच्या प्रतिनिधींना आमंत्रित करण्यात येणार आहे.

Advertisement

रशियाने हा निर्णय अशावेळी घेतला आहे, की ज्यावेळी बहुतांश देश तालिबानबाबत द्विधा मनस्थितीत आहे. चीन आणि पाकिस्तान वगळता अन्य कोणत्याही देशाने तालिबानबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही. आता रशियाने चीन आणि पाकिस्तानलाही मागे टाकले आहे. असा निर्णय घेतल्याने एक प्रकारे अमेरिकेचीही कोंडी होणार आहे. रशिया तालिबानच्या प्रतिनिधींना आमंत्रित करणार असला तरी प्रतिनिधी कोण असतील, याबाबत अद्याप काहीच स्पष्ट नाही. कारण, तालिबानच्या सध्याच्या सरकारमध्ये काही जागतिक दहशतवादी सुद्धा आहेत. त्यामुळे प्रतिनिधींबाबत काहीच स्पष्ट केलेले नाही.

Advertisement

तसे पाहिले तर रशियाने तालिबान सरकारला अद्याप मान्यता दिलेली नाही. तरी देखील तालिबानच्या विरोधात अद्याप काहीही केले सुद्धा नाही. उलट ज्यावेळी तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला त्यावेळी जवळपास सर्व देशांनी आपले दूतावास बंद केले. मात्र, रशियाने अजूनही अफगाणिस्तानमधील आपले दूतावास कार्यालय बंद केलेले नाही. आता तर तालिबानच्या प्रतिनिधींना बैठकीस आमंत्रित करण्याचा निर्णय या देशाने घेतला आहे. त्यामुळे रशियाचे तालिबानबाबत बदलत चाललेल्या धोरणाचा अंदाज येतो.

Advertisement

दुसरीकडे, अमेरिकेत मात्र तालिबानवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. तसेच पाकिस्तानवरही कठोर कारवाई करण्याची मागणी अमेरिकन खासदार करत आहेत. अमेरिकेने मात्र तालिबानबाबत आपले धोरण स्पष्ट केलेले नाही. संयुक्त राष्ट्रसंघही गोंधळात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण देता यावे, यासाठी तालिबानने पाठपुरावा केला होता. मात्र, संयुक्त राष्ट्रांनी तालिबानच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले नाही.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply