Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. भारताच्या पैशांवरच चालतयं की पाकिस्तानचे क्रिकेट; पहा, कुणी केलाय ‘हा’ खळबळजनक खुलासा

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या कुरापतींमुळे आज जगात पाकिस्तानला काहीच किंमत राहिलेली नाही. देशाच्या अर्थव्यवस्था तर पूर्णपणे कोलमडलेली आहेच. आता क्रिकेटचेही भवितव्य संकटात सापडले आहे. दहशतवादी कधीही हमला करतील म्हणून कोणताच देश पाकिस्तानचा दौरा करत नाही. त्यामुळे पाकिस्तानला पैसे मिळणेच बंद झाले आहे. जे काही आहे ते आयसीसीच्या मदतीने सुरू आहे. त्यातही आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनीच असा गौप्यस्फोट केला आहे, की ज्यामुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे. पण, त्यांनी जे काही सांगितले ते खोटे सुद्धा नाही, त्यामुळे कुणाला काहीच बोलता येईना, अशी परिस्थिती झाली आहे.

Advertisement

पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी हा खुलासा केला. त्यांनी सांगितले, की आयसीसीकडून मिळणाऱ्या पन्नास टक्के निधीतून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा कारभार सुरू आहे. आणि आयसीसीला जे पैसे मिळतात त्यामध्ये 90 टक्के वाटा एकट्या भारताचा आहे. एक प्रकारे भारतातील ज्या व्यापारी संस्था आहेत, त्याच सध्या पाकिस्तान क्रिकेट चालवत आहेत. उद्या जर भारताच्या पंतप्रधानांना वाटले की पाकिस्तानला मदत मिळू द्यायची नाही, तर हे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बरखास्तही होऊ शकते. विशेष म्हणजे, क्रिकेट बोर्डास या सगळ्या गोष्टी माहित आहेत पण, कुणी काहीच करू शकत नाही.

Advertisement

कोणताच देश पाकिस्तानचा दौरा करण्यास तयार नाही. यामागे भारत असू शकतो. पण, आयसीसीला निधी मिळवून देण्यात भारताचे योगदान इतके जबरदस्त आहे, की कुणी काहीच करू शकत नाही. पाकिस्तनचे योगदान मात्र काहीच नाही, अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

दरम्यान, आयसीसीने टी 20 विश्वचषक स्पर्धेची घोषणा केली आहे. येत्या 17 ऑक्टोबरपासून स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत मात्र भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. 24 ऑक्टोबर रोजी या दोन्ही संघा दरम्यान युएई येथे सामना होणार आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply