Take a fresh look at your lifestyle.

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात होणार.. ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय..!

मुंबई : दसरा-दिवाळीच्या तोंडावर ठाकरे सरकारने राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना गोड बातमी दिलीय. अधिकारी, कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 1 जुलै ते नोव्हेंबर 2019 या पाच महिन्यांच्या महागाई भत्त्याची वाढीव रक्कम ऑक्टोबरच्या वेतनात रोखीने मिळणार आहे. या निर्णयामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंदाजे 15 ते 20 हजार, तर कर्मचाऱ्यांना दरमहा 2 ते 5 हजार रुपयांची वाढ मिळणार आहे.

Advertisement

देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा बराच परिणाम झाला. त्यामुळे विविध योजना व सरकारी वेतनवाढीमध्ये कपात करण्यात आली होती. त्याचा फटका राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना बसला होता. पण आता राज्याची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येताना दिसत आहे.

Advertisement

राज्य सरकारी आणि निमसरकारी अधिकारी- कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 11 टक्क्यांनी वाढविण्यात आला आहे. राज्यातील तब्बल 19 लाख अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी दणक्यात साजरी होणार, हे नक्की..!

Advertisement

कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठवण्यात आला होता. मात्र, आता राज्यात कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली असून, राज्य सरकारचा आर्थिक गाडा रुळावर येत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ केली आहे.

Advertisement

सरकारी कर्मचाऱ्यांना 1 जुलैपासून 17 टक्क्यांऐवजी 28 टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. ऐन दिवाळीच्या काळात खूशखबर देत, राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केलीय. ऑक्टोबरपासून हा वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांतील थकबाकीबाबतही राज्य सरकार सकारात्मक असून, त्यासाठी स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे समजते.

Advertisement

दरम्यान, गेल्या पाच महिन्यांतील 10 टक्के वाढीव महागाई भत्त्याची थकबाकीही ऑक्टोबरच्या वेतनासोबत देण्यात येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांच्या अन्य प्रलंबित मागण्यांबाबतही सरकारने लवकर निर्णय घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply