Take a fresh look at your lifestyle.

आय्योव.. आलाय नवा विषाणूही; 7 जणांना लगाण, चीननंतर जपानचीही वाढली डोकेदुखी..!

दिल्ली : करोना विषाणूनंतर आणखी अनेक आरोग्याच्या समस्यांनी डोके काढण्यास सुरुवात केली आहे. अशावेळी जपानमधील शास्त्रज्ञांनी आणखी एक अज्ञात विषाणू ओळखला आहे. हा विषाणू मनुष्याला वेगाने संक्रमित करू शकतो. कारण याचे संक्रमण कीटकांच्या मार्फत होत आहे. याला येजो व्हायरस असे नाव देण्यात आले आहे. टिक नावाच्या कीटकाच्या चाव्याव्दारे हा पसरल्याचे मानले जाते.

Advertisement

प्राथमिक लक्षणांमध्ये ताप आणि प्लेटलेट्स कमी होणे आणि रक्तातील ल्युकोसाइट्स यांचा समावेश आहे. जपानच्या साप्पोरो येथील होक्काइडो विद्यापीठातील संशोधकांनी त्यांचे संशोधन नेचर कम्युनिकेशन्स जर्नलमध्ये प्रकाशित केले आहे. जपानमधील कमीतकमी सात लोकांनी 2014 पासून या व्हायरसची पुष्टी केली आहे, असे होकाईडो विद्यापीठाच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर झूनोसिस कंट्रोलच्या व्हायरलॉजिस्ट कीता मात्सुनो यांनी सांगितले. मात्र, कोणत्याही मृत्यूची पुष्टी झाली नाही. तथापि, जपानी तज्ञांचा असा विश्वास आहे की व्हायरसच्या प्रसाराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी होक्काइडोच्या बाहेर चाचणी केली पाहिजे.

Advertisement

प्राध्यापक मत्सुनो म्हणाले की, येझो व्हायरस संसर्गाची सर्व प्रकरणे आम्ही आतापर्यंत पाहिली आहेत. त्यातील एकही जीवघेणे नव्हते. पण ते होक्काइडोच्या बाहेर सापडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा प्रसार तातडीने तपासण्याची गरज आहे. येजो व्हायरस ऑर्थोनायरोव्हायरस म्हणून ओळखला गेला आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, चिनी शास्त्रज्ञांनी ऑर्थोन्यूरोव्हायरसचे नवीन रूप देखील शोधले होते. त्याला सोंगलिंग व्हायरस (SGLV) असे नाव देण्यात आले आहे.

Advertisement

जपानी संशोधकांनी सर्वप्रथम येझो विषाणूची पुष्टी केली होती. एका 41 वर्षीय व्यक्तीला ताप आणि पाय दुखत असताना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याआधी क्राइमियामध्ये, अझोव समुद्राच्या काठावर Arabat Spit येथे हजारो मृत पक्षी दिसले होते. शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की नवीन व्हायरल इन्फेक्शन हे पक्ष्यांच्या सामूहिक मृत्यूचे कारण असू शकते.

Advertisement
Advertisement

Leave a Reply