Take a fresh look at your lifestyle.

मुसळधार पावसामुळे कोट्यावधींचे नुकसान; मंत्री वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. चक्री वादळांच्या परिणामामुळे राज्यात मुसळधार पाऊस होत आहे. सध्या मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. या व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यातही पाऊस होत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे. त्यानंतर आता या मुद्द्यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे.

Advertisement

अतिवृष्टीमुळे राज्याचे मोठे नुकसान झाले असून केंद्र सरकारने राज्याला 7 हजार कोटी रुपये मदत द्यावी, अशी मागणी मंत्री वडेट्टीवार यांनी केली आहे. उस्मानाबाद, नांदेड, बीड, औरंगाबाद, लातूर, हिंगोली, परभणी अशा सर्वच जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनसह ऊस आणि अन्य पिकांचे नुकसान झाले आहे.

Advertisement

अशा परिस्थितीत सरसकट पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. मंत्री वडेट्टीवार यांनी मराठवाड्यातील नुकसान पाहणी केली. त्यानंतर त्यांनी केंद्र सरकारने सुद्धा राज्याला मदत द्यायला हवी, असे सांगितले. या प्रकरणी विरोधी पक्षातील नेत्यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले गुलाब चक्रीवादळाचे रुपांतर आता अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. या वादळाचा परिणाम राज्यात जाणवत आहे. हवामान विभागाने आज आणि उद्या अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

Advertisement

विदर्भ आणि मराठवाड्यातील चंद्रपूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात अतिवृष्टीचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तसेच ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यातही अति मुसळधार पाऊस होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply