Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. पाकिस्तानात पडलाय ‘त्याचा’ही दुष्काळ; पहा काय गंभीर परिस्थिती निर्माण झालीय तिथे..!

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटाने आज प्रत्येक देश हैराण झाला आहे. या संकटाने जगभरातील कोट्यावधी लोकांचे रोजगार हिरावले. त्यामुळे बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर काही देश सावरले आहेत. मात्र, पाकिस्तानसारखे देश या संकटात पुरते अडकले आहेत. पाकिस्तान मध्ये सध्या बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. देशातील युवकांना रोजगार देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. या महिन्यात देशातील बेरोजगारीचा दर सर्वाधिक राहिला आहे. शिपाई पदाच्या नोकरीसाठी तब्बल 15 लाख युवकांनी अर्ज केले आहेत.

Advertisement

पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ डेव्हलपमेंट इकॉनॉमिक्सने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये सध्या बेरोजगारी दर 16 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. देशात आजमितीस 24 टक्के शिक्षित लोक बेरोजगार आहेत. पाकिस्तान मधील हायकोर्टात शिपाई पदाच्या एका जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या पदासाठी थोडे थोडके नाही तर तब्बल 15 लाख अर्ज मिळाले. विशेष म्हणजे, अर्ज करणाऱ्यांमध्ये अनेक उमेदवार एमफील डिग्री धारक आहेत. मात्र, रोजगार मिळत नसल्याने त्यांनी शिपाई पदाच्या नोकरीसाठी अर्ज केले आहेत.

Advertisement

पाकिस्तानच्या सांख्यिकी कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2017-18 मध्ये देशात बेरोजगारी दर 5.8 टक्के होता. 2018-19 मध्ये 6.9 टक्के इतका वाढला. म्हणजेच, फक्त एकाच वर्षात बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढला. देशात बेरोजगारीची मोठी समस्या आहे. या समस्येवर मात करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. देशातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक आहे. मात्र, पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले आहे.

Advertisement

पाकिस्तानमध्ये बेरोजगारी व्यतिरिक्त अन्य मोठ्या समस्या आहेत. मात्र, याकडे कुणाचेच लक्ष नाही. पाकिस्तानी राजकारण सध्या तालिबान भोवती फिरत आहे. तालिबानी सरकारला जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठी पाकिस्तानी राज्यकर्ते सध्या धडपड करत आहेत. त्यामुळे देशात काय चालले आहे, याचे त्यांना काही देणेघेणे नाही. तालिबानला समर्थन देण्याच्या नादात देशाचे मोठे नुकसान होत आहे. अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. गरीबी वाढली आहे. काही ठिकाणी अन्न पाण्याचा दुष्काळ निर्माण झाला आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply