Take a fresh look at your lifestyle.

गुलाब चक्रीवादळाचा परिणाम; राज्यात आज आणि उद्या मुसळधार पाऊस; पहा, कोणत्या जिल्ह्यांना दिलाय अलर्ट

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्री वादळामुळे राज्यात आज आणि उद्या मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुलाब चक्रीवादळामुळे 28 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021 या कालावधीत कोकण किनारी भागातील जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Advertisement

या वादळाचा परिणाम राज्यात जाणवत असून राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यात पावसाची तीव्रता जास्त आहे. तसेच अन्य जिल्ह्यातही पाऊस होत आहे. काल सायंकाळी नगर शहरात सुद्धा जोरदार पाऊस पडला. त्यानंतर हवामान विभागाने आणखी दोन दिवस जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. राज्यातील पालघर, ठाणे,  रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर मुंबई, नंदूरबार, पुणे, नगर, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Advertisement

काल गुलाब चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारी भागात दाखल झाले. त्यामुळे कृष्णा आणि श्रीकाकुलम या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यानंतर पावसाचा जोर वाढत गेला. हवामान विभागाने आज आणि उद्या या दोन दिवसात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस होईल,  असा अंदाज व्यक्त केला  आहे.

Advertisement

दरम्यान, सध्या राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे येथे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अन्य जिल्ह्यात सुद्धा जोरदार पाऊस सुरू आहे. नगर शहरातही सकाळपासून ढगाळ हवामान आहे. काल शहरात जोरदार पाऊस पडला होता. सध्या पाऊस नाही. मात्र, पावसाचे वातावरण आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply