Take a fresh look at your lifestyle.

पंजाबमध्ये काँग्रेसला पुन्हा धक्का; आणखी एका काँग्रेस नेत्याने दिला राजीनामा

नवी दिल्ली : देशात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. देशात निवडणुकी आधी नेतृत्व बदलाचे वारे वाहत आहेत. काँग्रेस नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसला राज्यात आणखी एक झटका बसला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. सिद्धू यांनी राजीनामा का दिला, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असताना राज्यात घडणाऱ्या या घडामोडी काँग्रेससाठी अडचणीच्या ठरणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्षाच्या कारभारावर नाराज होत नुकताच राजीनामा दिला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षाने नव्या मुख्यमंत्र्यांची नियुक्ती केली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सिद्धू यांनी राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. राजीनामा दिल्यानंतर सध्या आपण काँग्रेस पक्षात राहणार असल्याचे सिद्धू यांनी म्हटले आहे.

Advertisement

दरम्यान, कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री पद मिळेल, असे सिद्धू यांना वाटत होते. मात्र, पक्षाने तसे काही केले नाही. आता मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री देण्यात आले. मात्र, सिद्धूंना उपमुख्यमंत्री पदही दिले गेले नाही. त्यामुळे ते नाराज होते. या नाराजीतून त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, असे असले तरी त्यांनी राजीनामा का दिला, याचे खरे कारण अद्याप समोर आलेले नाही.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply