Take a fresh look at your lifestyle.

गॅस टाकीवरील अनुदान पुन्हा सुरू होण्याची शक्यता ? ; जाणून घ्या, केंद्र सरकारचा काय आहे विचार

नवी दिल्ली : देशात इंधन दरवाढी पाठोपाठ गॅस सिलिंडरचे दर प्रचंड वाढले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच आता काही दिवसांपासून अनुदान मिळत नसल्याने नागरिकांना गॅस टाकीसाठी जास्त पैसे मोजावे लागत आहेत. या कारभारामुळे लोकांमध्ये सरकार विरोधात असंतोष निर्माण होत आहे. सध्याच्या दिवसात तर देशात महागाई काही केल्या कमी होण्यास तयार नाही.

Advertisement

मागील दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. खाद्यतेलांचे दर भरमसाठ वाढले आहेत. तसेच गॅस टाकीचेही दर सातत्याने वाढत आहेत.

Advertisement

अशा परिस्थितीत आता सरकारने लोकांना काही दिलासा देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. मोदी सरकारच्या गेल्या 7 वर्षांच्या काळात घरगुती गॅस टाकीचे दर दुपटीने वाढले आहेत. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर अनुदान बँक खात्यात जमा होऊ लागले. मात्र, सध्या सबसिडी मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Advertisement

आता मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालय अनुदान देण्याच्या विचारात असून यासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांकडून गॅस टाकीसाठी किती पैसे घेता येतील, गॅस टाकी किती रुपयांना विकता येईल, त्यानंतर किती रक्कम अनुदान म्हणून देता येईल यासाठी मंत्रालयाने सर्वेक्षण सुरू केल्याचे वृत्त बिजनेस स्टँडर्डने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

Advertisement

ग्राहकांना किती दराने गॅस टाकी देता येईल, यासाठीही सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी अनेक पर्याय विचारात घेण्यात येत आहेत. तसेच केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच अनुदान द्यावे का, याबाबतही विचार सुरू असल्याची माहिती आहे. आजमितीस राजधानी दिल्लीत काहीच अनुदान मिळत नाही. काही राज्यात फ्रेट कॉस्टच्या रुपात अनुदान देण्यात येते. या अनुदानाचे प्रमाण राज्यांनुसार वेगळे आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply