Take a fresh look at your lifestyle.

एमपीएससीचा अंतिम निकाल अखेर जाहीर, कुठे पाहता येणार, वाचा…?

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर राज्यसेवा परीक्षा 2019 चा अंतिम सुधारित निकाल जाहीर केला. एमपीएससी-2019 राज्यसेवा परीक्षेतील 413 पदांचा निकाल जाहीर झाला असून, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Advertisement

गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी या निकालाची प्रतीक्षा करीत होते. अखेर निकाल अखेर जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. हा सुधारित अंतिम निकाल व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Advertisement

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2019 च्या राज्यसेवा परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नियुक्त्या मिळविण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती. राज्य सेवा परीक्षा होऊन दोन वर्षे झाली, तरी नियुक्ती न मिळाल्याने विद्यार्थी आक्रमक झाले होते. काहींनी तर 10 सप्टेंबरपूर्वी नियुक्त्या न दिल्यास एमपीएससी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

Advertisement

उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, तहसीलदार, गटविकास अधिकारी या पदांसाठीच्या 413 नियुक्त्या रखडल्या होत्या. आता निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Advertisement

दरम्यान, राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020 ची तारीखही जाहीर करण्यात आलीय. त्यानुसार येत्या चार डिसेंबरला ही परीक्षा होणार आहे. सोबतच महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेचे आयोजन येत्या 18 डिसेंबर रोजी केले जाणार आहे.

Advertisement

मागील अनेक दिवसांपासून विद्यार्थी मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्याची मागणी करीत होते. अखेर एमपीएससी आयोगाने या परीक्षांबाबत स्वतंत्र परिपत्रक काढलंय. त्याद्वारे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020, तसेच अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या परीक्षा राज्यातील एकूण सहा केंद्रांवर होणार आहेत. त्यात औरंगाबाद, अमरावती, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे जिल्ह्यांतील केंद्रांचा समावेश आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply