Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. ‘त्या’ संकटापुढे चीन सुद्धा ठरतोय हतबल; एकाच झटक्यात अब्जावधींचा फटका; पहा, चीनमध्ये चाललेय तरी काय ?

नवी दिल्ली : एकपक्षीय हुकूमशाही असलेल्या चीन देशात आजमितीस वेगळेच संकट निर्माण झाले आहे. जगभरात आपल्या साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी चीनला त्याच्या उद्योग क्षेत्राचा नेहमीच पाठिंबा राहिला आहे. आज मात्र चीनमध्ये या उद्योग जगतासमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. या संकटापुढे चीन सुद्धा हतबल झाला असून अब्जावधींचे नुकसान सहन करावे लागत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचे आधि नुकसान होऊ नये, यासाठी या संकटावर मात करण्याचा प्रयत्न चिनी सरकार करत आहे.

Advertisement

इलेक्ट्रॉनिक उपकरणे, वाहने आणि अन्य प्रकारची उपकरणे तयार करण्यात आज चीन जगात आघाडीवर आहे. मात्र, देशात अनेक ठिकाणी विजेची प्रचंड टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कंपन्या बंद ठेवण्याची वेळ आली आहे. या काळात नागरिकांनी सुद्धा विजेची उपकरणे वापरू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. चीनच्या अनेक प्रांतात विजेची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे कंपन्यांनी उत्पादन कमी करावे, असे सरकारने म्हटले आहे. मात्र, यामुळे कंपन्यांचे उत्पादनच ठप्प होण्याच्या मार्गावर आले आहे. असे घडले तर या कंपन्यांना एकाच दिवसात अब्जावधींचा फटका बसण्याची शक्यता आहे. बाजारात देखील आवश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची भिती आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, अॅपल आणि टेस्ला सारख्या दिग्गज कंपन्यांना वीज टंचाईच्या समस्येमुळे उत्पादन कमी करावे लागले आहे. या संकटामुळे 15 चिनी कंपन्यांच्या कामगिरीवर विपरीत परिणाम झाला आहे. तर 30 पेक्षा जास्त कंपन्यांचे काम बंद पडल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यानंतर मागणीत वाढ झाली. त्यामुळे कंपन्यांनी मागणीनुसार उत्पादनात वाढ करण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणून आज चीनमध्ये सर्वत्र विजेच्या टंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

Advertisement

देशात औद्योगिक उत्पादन वाढण्याबरोबरच कोळशाचीही टंचाई जाणवत आहे. कारण, चीनमध्ये कोळशापासून मोठ्या प्रमाणात वीज निर्माण केली जाते. विशेष म्हणजे, यावेळेस मागील वर्षाच्या तुलनेत जास्त वीज निर्मिती करण्यात आली. तरीसुद्धा आज वीज टंचाईचे संकट आहे. कोळसा, नॅचरल गॅस कमतरतेमुळे संकट आधिक वाढले आहे. आता या संकटातून बाहेर पडण्यासाठी चिनी सरकार काय कार्यवाही करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply