Take a fresh look at your lifestyle.

ग्रॅच्युटीच्या नियमांमध्ये बदल.. पाहा आता किती व कसे पैसे मिळणार..?

नवी दिल्ली : कोणत्याही कर्मचाऱ्याला कंपनीकडून मिळणारा अवार्ड म्हणजे ग्रॅच्युटी.. एखादा कर्मचारी नोकरीच्या सर्व अटी पूर्ण करीत असेल, तर ठरलेल्या सूत्रानुसार त्याला ग्रॅच्युटीची (gratuity) पूर्ण रक्कम मिळते. ग्रॅच्युटीचा एक छोटा भाग कर्मचाऱ्याच्या सॅलरीमधून दरमहा कापला जात असतो. कर्मचाऱ्याने कंपनीत 5 वर्षांपर्यंत काम केलेले असल्यास त्यास ही रक्कम दिली जाते.

Advertisement

केंद्र सरकारने अलीकडेच केंद्रीय नागरी सेवा (नॅशनल पेमेंट सिस्टम अंतर्गत ग्रॅच्युटीचे पेमेंट) नियम, 2021 अधिसूचित केले आहेत. हा कायदा ग्रॅच्युटीशी संबंधित आहे. त्यात संरक्षण सेवा आणि केंद्रासाठी सिव्हिल सर्व्हिसच्या पदावर नियुक्त नागरी सरकारी नोकरांचाही समावेश आहे. ज्यांची नियुक्ती जानेवारी 2004 च्या पहिल्या दिवशी किंवा नंतर झाली असेल, त्यांच्यासाठी हा नियम लागू असेल.

Advertisement

ग्रॅच्युटीसाठी कोणते दावे नवीन नियमानुसार लागू होतील, त्यासाठी, एखादा सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त होत आहे, किंवा सेवानिवृत्त झाला आहे का, त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे का, त्याला सेवेतून निवृत्त होण्याची परवानगी देण्यात आली आहे का, हे पाहिले जाईल. कर्मचाऱ्याची परिस्थिती काहीही असो, त्यानुसार ग्रॅच्युटीचा दावा केला जाईल.

Advertisement

एखादा सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त होईल किंवा निवृत्त होणार आहे किंवा डिस्चार्ज होणार आहे किंवा राजीनामा देण्यास मंजुरी मिळाली आहे, तो दिवस कर्मचाऱ्याच्या कामाचा शेवटचा दिवस मानला जाईल. त्यानुसार ग्रॅच्युटीची गणना केली जाईल. कर्मचाऱ्याचा मृत्यू होईल, त्या दिवशी कामकाजाचा दिवस मानून ग्रॅच्युटीची गणना केली जाईल.

Advertisement

केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार, सेवानिवृत्ती ग्रॅच्युटी ही सरकारी कर्मचाऱ्याला त्याच्या सेवेची 5 वर्षे पूर्ण झाल्यावरच दिली जाईल. यासह कर्मचाऱ्याने खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.

Advertisement
  • कर्मचाऱ्याने सेवानिवृत्ती किंवा अवैधतेच्या वयात निवृत्त व्हावे किंवा कर्मचारी निवृत्त झाला आहे किंवा सेवानिवृत्तीच्या वयापूर्वी निवृत्त होणार आहे. अथवा ज्या नोकरीत कर्मचारी कार्यरत होता आणि नोकरीमध्ये तो अतिरिक्त घोषित झाला आणि अतिरिक्त कर्मचाऱ्याच्या बाबतीत विशेष स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे.
  • केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही कंपनी किंवा महामंडळात सेवा किंवा पद मिळवण्याची परवानगी देण्यात आली असेल, केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही संस्थेत पद किंवा सेवा प्राप्त झाली असेल, तर अशा सरकारी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

कर्मचाऱ्याला त्याच्या एकूण मोबदल्याच्या आधारावर ग्रॅच्यूटी दिली जाईल. नोकरीत पूर्ण झालेल्या 6 महिन्यांच्या एकूण मोबदल्याच्या एक चतुर्थांश हिस्सा ग्रॅच्युटीचा असेल. हा कमाल एकूण मोबदल्याच्या 161/2 पट असू शकतो. येथे एकूण मोबदला म्हणजे सरकारी कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीपूर्वी किंवा मृत्यूच्या दिवशी किती मूलभूत पेमेंट मिळत होते. जर कर्मचाऱ्याला डॉक्टरच्या पदावर नियुक्त केले गेले असेल, तर त्याच्या मूळ देयकामध्ये नॉन-प्रॅक्टिसिंग भत्ता देखील जोडला जाईल.

Advertisement

जलयुक्त शिवार योजनेतील कामांची चौकशी सुरु, नेमके काय आरोप करण्यात आलेत..?
… तर थोड्याच दिवसात सोने 50 हजारांचाही टप्पा पार करणार; आज पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात वाढ

Advertisement
Advertisement

Leave a Reply